Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»‘होम वोटिंग’च्या सुविधेवर असणार कॅमेऱ्याची नजर : उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे
    चोपडा

    ‘होम वोटिंग’च्या सुविधेवर असणार कॅमेऱ्याची नजर : उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoApril 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    ८५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या मतदारांसाठीच ‘होम वोटिंग’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा अशा उमेदवारांची भेट घ्यावी. ‘होम वोटिंग’ करताना उमेदवाराच्या घरी स्वतंत्र मतदार कक्ष उभारावा. ‘होम वोटिंग’ करताना तेथे व्हिडिओ कॅमेरा नेऊन मतदान करतानाचे चित्रीकरण करावे. होम वोटिंगसाठी लवकरच गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यानुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी आयोजित आढावा बैठकीत उपस्थित सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले.

    यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

    क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या सोयीसाठी मंडप उभारावेत. मतदान केंद्रांवर पाळणा घराची सोय करण्यात यावी. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एनसीसी कॅडेट्स यांची मदत घेऊन आवश्‍यक त्या मूलभूत सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडले तर योग्य ती खबरदारी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आवाहन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.