Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»स्मिता वाघ यांच्या उमेदवारीच्या रूपाने नारीशक्तीचा सन्मान
    चाळीसगाव

    स्मिता वाघ यांच्या उमेदवारीच्या रूपाने नारीशक्तीचा सन्मान

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपा महायुतीचा बालेकिल्ला आहे. पक्षाने वेळोवेळी ज्याला उमेदवारीची संधी दिली त्याला भरघोस मतांनी जनतेने विजयी केले आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या श्रीमती स्मिता वाघ यांना नेतृत्वाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन आ.मंगेश चव्हाण यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

    बैठकीला ज्येष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, सुरेश सोनवणे, संजय पाटील, के.बी.साळुंखे, प्रेमचंद खिवसरा, सुरेश स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, शेषराव पाटील, जगन महाजन, महिला मोर्चाच्या देवयानी ठाकरे, संगीता गवळी, बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, संघटना पदाधिकारी प्रशांत पालवे, धनंजय मांडोळे, रमेश सोनवणे, प्रा.सुनील निकम, नितीन पाटील, घृष्णेश्‍वर पाटील, शेतकी संघाचे अविनाश चौधरी, विवेक चौधरी, अमोल चव्हाण, अमोल नानकर, गिरीष बऱ्हाटे, युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, गोरख राठोड, मनोज गोसावी, तालुक्यातील भाजपचे सुपर वॉरीयर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

    २०१४ नंतर भारताच्या विकासाला मिळालेली गती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम पाहून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतात ३०० हून अधिक जागा भाजपाच्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा डंका वाजत आहे. त्यामुळे भारताला विकसित देश करण्यासाठी त्यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. त्यामुळे “अबकी बार ४०० पार” चा नारा पक्षाने दिला असल्याचेही आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon: बसस्थानकावरील गर्दीत महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र लंपास

    March 2, 2026

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.