Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»शिवसेना-उबाठाकडे महिलांचा वाढता कल : वैशाली सूर्यवंशी
    भडगाव

    शिवसेना-उबाठाकडे महिलांचा वाढता कल : वैशाली सूर्यवंशी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भडगाव : प्रतिनिधी

    आचारसंहिता लागण्याच्या आधी भडगाव तालुक्यातील उर्वरित गावांमध्ये शाखांचा शुभारंभ करण्याचा आमचा संकल्प आहे. मतदारसंघातून पुरूषांच्या सोबतीने महिलांचाही वाढता कल मिळत असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केले. त्या तालुक्यातील कजगाव-वाडे गटातील शिवसेना शाखांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.

    वैशाली सूर्यवंशी यांनी ‘गाव तिथे शाखा’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षाची शाखा सुरू करण्यात येत आहे. आज या उपक्रमाच्या अंतर्गत सकाळी भडगाव तालुक्यातील कनाशी, वाडे, बांबरूड, गोंडगाव, घुसर्डी, सावदे, लोण, बोरनार, बोदर्डे व निंभोरा या गावांमध्ये शिवसेना शाखांचा शुभारंभ करण्यात आला. त्यातील प्रत्येक गावांमध्ये वैशाली सूर्यवंशी यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार जयघोषणात स्वागत करण्यात आले. प्रत्येक शाखेच्या फलकाचे पूजन करून फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी जोरदार जयघोषणांनी परिसर दणाणला होता.

    गोंडगाव येथे बोलतांना योजना पाटील यांनी भडगाव तालुक्यातील जनता वैशालीताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून त्यांना आमदार बनविणारच आहे, असे सांगितले. शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला वैशाली सूर्यवंशी यांच्यासोबत गणेश परदेशी, प्रशांत पवार, मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, योजना पाटील, ॲड.प्रवीण पाटील, जे.के.पाटील, चेतन पाटील, माधव जगताप, बाळू अण्णा, भालचंद्र पाटील, अरुण पाटील, गोरख पाटील, विजय साळुंखे, रतन परदेशी, राजेंद्र परदेशी, अशोक माळी, अण्णा चौधरी, शांताराम पाटील, अण्णा महाजन, गोपाल महाजन, दत्तू मांडोळे, श्‍याम पाटील, संजय पाटील, शुभम पाटील, वाल्मीक पाटील, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026

    Bhadgaon : भडगावात मुलांना वाचवताना दोन तरुणांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

    March 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.