Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सात नाटकांचे सादरीकरण
    जळगाव

    राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सात नाटकांचे सादरीकरण

    SaimatBy SaimatJanuary 16, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव जळगाव

    सांस्कृतीक कार्य संचालनालयाच्यावतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ७ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. एका पेक्षा एक सरस विषय घेवून सादर झालेल्या नाटकांनी काही महत्त्वाच्या सामाजिक विषयात हात घालत रसिकांना खिळवून ठेवले.

    राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रांजल पंडित लिखित आणि चंद्रकांत कुमावत दिग्दर्शित फुपाखरू या नाटकाने झाली. शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयाच्या बाल कलाकारांनी हे नाटक सादर केले. चार मैत्रिणींच्या ‘काय खेळ खेळायचा’ या विचारातून आपापली स्वप्ने सांगण्याची संकल्पना सुचते. एक-एक करून त्या मैत्रिणी आपापले स्वप्न व त्या मागील कहाणी सांगू लागतात. आणि येथून सुरू होते फुलपाखरुची खरी कहाणी. प्रत्येक बालमनात खूप गोष्टी असतात, त्यांची प्रत्येकाची आपली स्वप्ने असतात. अशाच एका वेगळ्या आणि स्वतंत्र स्वप्नाची ही गोष्ट आहे.

    परी – जामनेर येथील लोकरंजन संस्थेने सादर केलेल्या परी या नाटकाच्या माध्यमातून ‘मासिक पाळी’ या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. अनेक महिला आजही या विषयावर बोलणे टाळतात. मात्र, या विषयाकडे दुर्लक्ष न करता महिलांनी मग त्या कोणत्याही क्षेत्रात किंवा पदावर असोत… जसे की, विद्यार्थिनी, शिक्षिका, मैत्रीण. सर्वांनी या विषयावर मनमोकळे पणाने बोलावं, बालपणीच मुलींना याबाबत माहिती द्यावी, असा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.

    कॉपी बहाद्दर – जळगाव येथील खान्देश लोकरंग फाउंडेशनने जीवनात शॉर्टकट पद्धतीने पुढे जाणाऱ्या व या शॉर्टकट पद्धतीमुळे कसे नुकसान होते, हे दाखविण्याचा तसेच चांगला आदर्श विद्यार्थी अभ्यास केल्यानेच घडतो, हा संदेश कॉपी बहाद्दर या नाटकातून दिला आहे.
    राक्षस – लहान मुलांना अभ्यासाची खूप भीती वाटते. मुलांच्या मनातील ही भीती घालविण्यासाठी स्वतः पुस्तके अस्तित्वात येवून मुलांना पुस्तकाचे महत्त्व पटवून देतात. पुस्तकं ही आपली खरी मित्र आहेत. त्यांच्या विना आपण कुठलीही भाषा बोलू शकत नाही, व्यवहार करू शकत नाही. पुस्तक वाचाल तर वाचाल, असा संदेश या नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. जळगाव येथील जिवनविकास सामाजिक संस्थेच्या बालकलाकारांनी हे नाटक सादर केले.

    गुंडाळलेले स्वप्न – सामाजिक जीवनात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लहान बालकांच्या मनावर परिणाम होवून ही मुले कशी चुकीच्या मार्गावर मार्गक्रमण करतात आणि या त्यांच्या चुकीच्या गोष्टीचे खापर परिस्थितीवर फोडतात. परिस्थितीच व्यक्तीला चुकीचं निर्णय घेण्यास भाग पाडते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या नाटकातून झाला आहे. चुकीचा मार्ग निवडण्याआधी खूप वेळ विचार करून मगच ते कार्य करावे, असा संदेश यातून देण्यात आला आहे. भुसावळ येथील साने गुरुजी वाचनालयाने हे नाटक सादर केले.
    सुपर पावर – सार्वे येथील स्वराज्य प्रतिष्ठानने सादर केलेले हे नाटक एका आळशी मुलावर आधारित आहे. त्या मुलाला अभ्यास न करता सुपरपॉवरची अपेक्षा असते. त्याला सुपरपॉवर मिळते सुद्धा. परंतु, ही सुपरपॉवर संपल्यानंतर त्याला त्या गोष्टीची जाणीव होते, की सुपरपॉवर वगैरे काही नाही. त्यानतंर तो अभ्यासाला लागतो आणि वर्गात पहिला येतो.
    ढगाला लागली कड – लहान मुलांनी काही ऐकलं, पाहिलं तर त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होवून त्याची उत्तरे शोधण्याचा ते प्रयत्न करतात. त्यांना योग्य उत्तर मिळाले तर ते संतुष्ट होतात. नाही तर वेगळ्या मार्गावर जावून आपल्या प्रश्नाची उत्तरे शोधतात.
    अशाच ढगाला लागली कड हे गाण ऐकून डोक्यात प्रश्न निर्माण झालेल्या रोहन नावाच्या एका लहान मुलाची ही कहाणी या नाटकातून मांडण्यात आली आहे. त्याला या प्रश्नाचे वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी उत्तर मिळतात. मात्र, आपले शिक्षकच असतात, तेच आपल्याला पडलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे देवू शकतात, असा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे. जळगाव येथील यादव देवचंद पाटील विद्यालयाच्या बाल कलाकारांनी हे नाटक सादर केले.
    बालनाट्य स्पर्धेला दुसऱ्या दिवशी देखील रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. संपूर्ण सभागृह रसिकांनी भरले होते. बाल कलाकारांनी सादर केलेल्या नाटकाला टाळ्यांनी साद घालत उत्साह वाढविला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव क्रिकेट उत्सव: JCL 2026 – पर्व 2; T20 थरार घेऊन येणार, स्थानिक खेळाडूंना सुवर्णसंधी

    March 20, 2026

    Dharangaon : धरणगाव तालुक्यातील जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीवर गुन्हा नोंद

    March 20, 2026

    Jalgaon : आर आर विद्यालयात गुढीपाडवा उत्सव: मराठी नववर्षाचे स्वागत ‘स्वररंग’ कार्यक्रमाने

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.