Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»देवझिरी शासकीय आश्रमशाळेत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर
    चोपडा

    देवझिरी शासकीय आश्रमशाळेत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा तालुक्यातील देवझिरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू तृतीय वर्ष व एमएसडब्ल्यू द्वितीय वर्ष क्षेत्रकार्याच्या वैजापूर व मुळ्यावतार गटाचे क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. प्रा. आशिष गुजराथी, प्रा. नारसिंग वळवी यांच्या लक्षात आले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांनी शिबिराचे आयोजन केले होते.

    शिबिरासाठी वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा अधिकारी राजेंद्र रनाळकर, महालॅबचे तंत्रज्ञ प्रमोद ठाकरे यांनी सहकार्य केले. शिबिराच्या आयोजनाचे नियोजन क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. प्रा. आशिष गुजराथी, प्रा. नारसिंग वळवी यांनी केले. यावेळी राजेंद्र रनाळकर यांनी विद्यार्थ्यांना रक्तातील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाचे महत्त्व काय? व ते किती असावे? ते संतुलित ठेवण्यासाठी आपण कोणता आहार घेतला पाहिजे? कोणती काळजी घेतली पाहिजे? याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. शिबिरात ४५ मुले व ४० मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

    शिबिरासाठी आश्रमशाळेतील शिक्षक एस. एम. सुरवाडे, सी. जी. बारेला, ए. आर. पावरा, आर. बी. बारेला, एम. झेड. बारेला, सी. जी. बारेला व शिपाई के. के. पावरा यांनी सहकार्य केले. तसेच वैजापूर क्षेत्र कार्य गटातील विद्यार्थी दुर्गेश पावरा, हिमानी पाटील, विशाल भालेराव, वैष्णवी धनगर, संदीप पावरा व मुळ्यावतार क्षेत्र कार्य गटातील अजित भील, दीपाली रामोशी, नेहा देशमुख, लोकेश गवळी, अरुण भोई, अश्विनी धनगर आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शिबिरानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वैजापूर गावातील आशा वर्कर व ग्रामस्थांना मागील क्षेत्र कार्यात नोंदणी केलेल्या आभा कार्डचे वितरण करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026

    Chopda:चोपड्यात घरासमोर गाडी लावण्यावरून हाणामारी

    February 20, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.