साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने नारायण वाडीतील विठ्ठल मंदिर समोरील संघाच्या मालकीच्या जागेत स्वागत गेटसह कंपाऊंड वॉल तसेच मोकळ्या ग्राऊंडवर सिमेंटचे पेव्हर ब्लॉक या विकास कामांसाठी आमदार निधीतून दहा लाख देण्याची मागणी केली आहे. राजेंद्र गंगाधर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या आ.लता चंद्रकांत सोनवणे यांचे स्वागत करून मागणीचे निवेदनही देण्यात आले.
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व्ही.एच. करोडपती, सचिव प्रमोद डोंगरे, जयदेव देशमुख, यशवंत जडे, दिलीप पाटील, सेवानिवृत्त तलाठी एम.बी.साळुंखे, जे.एच.नेरपगारे, प्रभाकर बैरागी, सुभाष पाटील यांना आ.लता सोनवणे यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे राजेंद्र पाटील यांच्यासह उपस्थित शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या समक्ष आश्वासनही दिले. सर्वांनी आश्वासनाबद्दल समाधान व्यक्त करून विकासकामे पूर्ण झाल्यास लोकार्पणासाठी लवकरच चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचा मार्ग मोकळा होईल, असेही सूचित केले.