Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गणपती विसर्जन मिरवूणक उत्साहात
    जळगाव

    गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गणपती विसर्जन मिरवूणक उत्साहात

    SaimatBy SaimatSeptember 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव जळगाव

    गणपती बाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या… असे म्हणत डीजे समवेत गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणूकी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील तसेच भावी खासदार डॉ.केतकी पाटील यांच्यासह पाटील कुटूबियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
    गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात पाच दिवसांचा गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी महाविद्यालय परिसरात आकर्षक सजावट करुन ग्रामीण संस्कृतीचे दर्शन दाखविणारा देखावा देखील यावर्षीचे आकर्षण ठरला. शनिवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला वाजत-गाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला.
    मिरवणूकीत संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, चिमुरड्या कु.किवा व कु.सारा ह्यांची देखील विशेष उपस्थीत होती. डोक्यावर फेटे परिधान करुन गाण्यांच्या तालावर ठेका धरत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व भावी खासदार डॉ.केतकी पाटील यांनी मिरवणूकीची शोभा वाढविली. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा वाघ, शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह संपूर्ण स्टाफ सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गणेशोत्सव मिरवणूकीचा आनंद लुटला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.