Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»समाजाला जडला ‘करिअरचा’ कॅन्सर : प्रा. रमेश महाजन
    चोपडा

    समाजाला जडला ‘करिअरचा’ कॅन्सर : प्रा. रमेश महाजन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    पूर्वीच्या काळी शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर असे होते. तिथे खरोखरच जीवनाचे शिक्षण तेव्हा मिळत होते. तेव्हा विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्यांच्यावर संस्कार केले जात होते. आज मात्र पालकांच्या अवास्तव अपेक्षा, मुलांवर सांगितला जाणारा मालकी हक्क यामुळे मुलांची भावनात्मक कोंडी होऊ लागली आहे. त्यातून मुलांच्या आत्महत्येची संख्या वाढू लागली आहे. मुलांना शाळेतही व्यक्त होता येत नाही. त्यांच्या आवडी, कल, कौशल्य लक्षात न घेता त्यांच्यावर करियरसाठी लहान वयातच दबाव वाढत आहे. एक प्रकारे समाजाला ‘करिअरचा कॅन्सर’ जडला आहे, असे परखड मत मांडताना ‘शिक्षकांनी संवादी बनावे’ असे धरणगाव येथील विक्रम ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा. रमेश महाजन यांनी व्यक्त केले. आनंदराज पॅलेस याठिकाणी रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे आयोजित ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात ते ‘विद्यार्थी केंद्रीत शिक्षण आणि शिक्षकांची भूमिका’ विषयावर बोलत होते. यावेळी मंचावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटिया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख गौरव महाले, प्रकल्प सहप्रमुख महेंद्र बोरसे, संजय बारी आदी उपस्थित होते.

    प्रा. रमेश महाजन यांच्या हस्ते मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीत अर्चना रवींद्र शिंदे (जि.प.प्राथमिक शाळा, कमळगाव), प्रल्हाद उत्तम पाटील (जि.प.प्राथमिक शाळा, धानोरे प्र.चोपडा), रवींद्रकुमार भीमराव पाटील (जि.प.मराठी मुलांची शाळा नं.३, चोपडा), पवन पांडुरंग रणधीर (जि.प.प्राथमिक शाळा, कुंड्यापाणी), भावना रमेश पाटील (जि.प.मुलींची शाळा, अडावद), तब्बसुम बानो अल्ताफ अली सय्यद (उर्दू हायस्कूल, अडावद), दीपक भास्कर पाटील (सौ.प.रा. भादले प्राथमिक आश्रमशाळा, उमर्टी), नितीन मधुकर पाटील (मातोश्री अवंताबाई पाटील अनुदानित आश्रमशाळा, संपुले), अमित आनंदराव बाविस्कर (आश्रमशाळा, हातेड), अनंत श्रीराम पाटील (नूतन माध्यमिक विद्यालय, चुंचाळे), सुरेश शंकर चौधरी (अण्णासो एस. आर. पाटील माध्यमिक विद्यालय, मामलदे) अशा शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष चेतन टाटिया, सूत्रसंचालन संध्या शहा तर आभार अर्पित अग्रवाल यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.