चाळीसगावला ठाकरे गटाला पडले पुन्हा खिंडार

0
11

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेत ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शिवसेना नेते उमेश गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा मूळ शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. जिल्हाप्रमुख असतांनाही एवढा मोठा कार्यक्रम झाला नव्हता. चाळीसगावची शिवसेना आज तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या नेतृत्वात खऱ्या आर्थाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून मुक्त केली असल्याचे प्रतिपादन आ.किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात तालुका संघटक गुणवंत शेलार, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय पाटील, समाधान मराठे, टेंकनेश्वर पाटील, प्रदीप मगर, उपशहरप्रमुख विनोद जाधव, भाऊसाहेब सोमवंशी, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीप राठोड, युवासेना जिल्हा समन्वयक सागर पाटील, युवासेना शहर प्रमुख सागर चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, वैद्यकीय मदत कक्ष शहरप्रमुख शुभम राठोड, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा पवार, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख अनिता शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषा महाजन, महिला आघाडी शहरप्रमुख सुवर्णा राजपूत,
युवासेना शहर संघटक मनिष सैंदाणे, युवासेना उपशहरप्रमुख दीपक बारी, रोशन चव्हाण, दिनेश कासार यांच्यासह अनेकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

यावेळी शिवसेना युवासेना, महिला आघाडीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. याबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here