पुण्यात वृद्ध महिलेला तरुणींकडून मारहाण;आईचीही साथ

0
29

पुणे :

पुण्याच्या शिक्रापूर परिसरात दोन मुलींनी एका ज्येष्ठ महिलेला निर्दयीपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, वृद्ध महिलेच्या अंगावर बसून तरुणीने तिला मारहाण केल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या दोन बहिणी असून त्यांना त्यांची आईदेखील यामध्ये साथ देताना दिसत आहे तर मारहाण झालेली वृद्ध महिला ही शेजारी राहत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन मुली आणि त्याच्या आई विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधित मुलींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here