Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»धरणगावला ग्रामीण रुग्णालयातर्फे युवा दिनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
    धरणगाव

    धरणगावला ग्रामीण रुग्णालयातर्फे युवा दिनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच आय.सी.टी.सी.विभाग ग्रामीण रुग्णालय, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच आंतरराष्ट्रीय युवा दिना साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.पाटील होत्या. यावेळी पर्यवेक्षक ए. एस. पाटील, डॉ. मयूर जैन (दंतचिकित्सक ग्रामीण रुग्णालय, धरणगाव), आयसीटीसी विभागाचे समुपदेशक ज्ञानेश्वर शिंपी, राजेश्वर काकडे, गणेश कुंभार, आरोग्य सेवक आर.के.देशमुख, श्री. सैंदाणे उपस्थित होते.

    कार्यक्रमात आर.के. एस.के. समुपदेशक गणेश कुंभार यांनी युवकांच्या जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केले. तसेच एचआयव्ही एड्स व गुप्त रोग या संवेदनशील विषयासंबंधी युवकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरीता रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला अनुसरून समुपदेशक शिंपी यांनी एचआयव्ही एड्स व गुप्त रोग यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. डॉ. मयूर जैन यांनी तंबाखू प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत युवकांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाच्यावतीने ए. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

    एचआयव्हीविषयी पोस्टर प्रदर्शनाद्वारे जनजागृती

    तरुणांसाठी हरितक्रांती जगाच्या स्वस्त विकासासाठी हरितक्रांती तरुणांची माहिती पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले. यानंतर रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. पोस्टर प्रदर्शनाद्वारे एचआयव्ही जनजागृती करण्यात आली. तसेच युवक युवतींना आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त शपथ देण्यात आली. यशस्वीतेसाठी ज्युनियर कॉलेज विभागाच्या सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा.पी.पी.पाटील तर आभार प्रा. ए.एस. सूर्यवंशी यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.