साईमत, प्रतिनिधी, जळगाव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानांतर्गत महानगरपालिकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी मनपा संचलित बालवाडीतील मुले तसेच मनपा शाळेतील इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थिनींना सकाळी 9.30 वाजता शालेय गणेश व स्कूलबॅग वाटप प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले.
यावेळी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थी, विद्यार्थिनींना शालेय गणवेश व बॅग वाटप करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्रीताई सुनील महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवणे व गुणवत्ता वाढवणे आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास उपायुक्त अविनाश गांगोडे, सहा आयुक्त गणेश चाटे, सहा.आयुक्त अभिजीत बाविस्कर, सहा.आयुक्त अश्विनी गायकवाड, तसेच नगरसेवक राजेंद्र (घुगे)पाटील, विशाल त्रिपाठी, प्र.सहा.आयुक्त उदय पाटील (आरोग्य ), प्रशासन अधिकारी (शिक्षण ) श्रीमती दीपाली पाटील , नगरसचिव सुनील गोराणे तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच मनपा संचलित बालवाडीतील मुले,महापालिकेच्या शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनी, शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



