Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस शिक्षा
    क्राईम

    अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस शिक्षा

    SaimatBy SaimatMay 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत चोपडा प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्याया आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने पोक्सो व इतर विविध कलमांतर्गत शिक्षा सुनावली आहे. दीपक रविन्द्र भिल (रा. अकुलखेडा , ता.चोपडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    या घटनेत पिडीत मुलीच्या आईने 5 फेब्रुवारी, 2020 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला (गुरन. 25/20) भा.दं.वि. 363 कलमानुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. तपासाअंती आरोपी दीपक भिल 17 फेब्रुवारीरोजी देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे पोलिसांना पिडीत मुलीसोबत मिळून आला होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या जवाबानुसार त्याच्याविरुद्ध या गुन्हयात भादंवि. 376 (1) (ए), 376 (3) सह बालकांचे लैंगिक गुन्हयापासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. आरोपी दिपक भिल यास अटक करण्यात आली होती.
    या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांनी पुर्ण करुन आरोपीविरुध्द अमळनेर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. तपासातील सबळ पुरावे उपलब्ध करुन अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

    आरोपी दीपक द्र भिल यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी भादंवी कलम 363 अन्वये 7 वर्ष कैद, पोक्सो कलम 4 मध्ये 20 वर्षे कैद, पोक्सो कलम 8 मध्ये 3 वर्ष कैद अशी शिक्षा सुनावली.   गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर यांना पोहेकॉ प्रदीप राजपुत, पो.ना. जयदिप राजपुत, पो.ना. मधुकर पवार आदींनी मदत केली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील एस. आर. पाटील यांनी तर पोका  नितिन कापडणे यांनी केसवॉच म्हणून काम पाहीले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगर हादरले शेतात आढळले नवजात अर्भकाचे प्रेत

    April 5, 2026

    Bhusawal : नवोदय विद्यालयाजवळील विहिरीत अनोळखी मृतदेह भुसावळात खळबळ

    April 5, 2026

    ​​Jalgaon : जळगावात मध्यवर्ती भागात घरफोडी; बंद घर फोडून ५७ हजारांचा ऐवज लंपास

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.