Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर, बोदवड व सावदा येथील विविध कामांसाठी 20 कोटीचा निधी मंजूर !
    जळगाव

    मुक्ताईनगर, बोदवड व सावदा येथील विविध कामांसाठी 20 कोटीचा निधी मंजूर !

    SaimatBy SaimatJuly 26, 2022No Comments6 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर प्रतिनिधी:- राज्यात सत्तांतर झाल्यांनतर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा , बोदवड व मुक्ताईनगर पालिका हद्दीतील रखडलेल्या पायाभूत व मुलभूत सुविधांसाठी नमूद कामांच्या सूचीनुसार निधीसह मंजुरीची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मुक्ताईनगर मतदार संघाला मोठे गिफ्ट दिले असून सुमारे 20 कोटीच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली. यात मुक्ताईनगर शहरातील दिवा स्वप्न ठरलेले व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स) साठी 4 कोटी रु. च्या तरतुदीसह मंजुरी मिळाली असून मुक्ताईनगर शहर टपरी मुक्त करून छोटे छोटे व मोठे व्यावसायिक यांना न्याय देणार असल्याचे वचन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले होते त्या वचनपूर्तीच्या दृष्टीने त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून 25 जुलै रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयात व्यापारी संकुल व मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच बोदवड येथील तेली समाजासाठी संत जगनाडे महाराज सांकृतिक सभागृह बांधकाम करणे व संत सेना महाराज सभागृहास संरक्षण भिंत बांधकाम करणे आदी विकास कामांना भरीव निधीच्या तरतुदीसह मंजुरी मिळाली आहे.
    मुक्ताईनगर , बोदवड व सावदा येथील मंजूर विविध विकास कामे पुढील प्रमाणे :1)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील नगरपंचायत मालकीच्या जागेत मुख्य चौकात व्यापारी संकुल बांधकाम करणे. ता.मुक्ताईनगर (400 लक्ष) 2)मुक्ताईनगर नगरपंचायतची प्रशासकीय इमारत बांधकाम करणे.ता.मुक्ताईनगर 150 लक्ष 3)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.16 मधील जैन मंदिराजवळ आर सी.सी.गटार बांधकाम करणे . ता.मुक्ताईनगर 4)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील मधील काळे मेकॅनिक यांचे घरापासून ते शेवाळे यांचे घरापर्यंत व दुबे यांचे घरापासून शेवाळे यांचे घरापर्यंत आर सी सी नाला व गटार बांधकाम करणे. तसेच संजीव पाटील ते ठाकूर कंडक्टर यांचे घरापर्यंत आर.सी.सी.नाला बांधकाम करणे.ता.मुक्ताईनगर 5)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.13 मधील विश्वकर्मा मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे. 6)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.1 मधील नागेश्वर मंदिर ते आठवडे बाजार कोपऱ्यापर्यंत व दीपक खुळे ते मुतारी जवळील विसाव्या पर्यंत उर्वरित आर सी सी गटार बांधकाम करणे. 7)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.1 मधील बाळू महाजन ते टाकरखेडे ते पोष्ट ऑफिस रस्त्याच्या दुतर्फा आर सी सी गटार बांधकाम करणे. 8)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.2 मध्ये लग्न समारंभासाठी आझाद मैदानावर आमीरसाहेब यांच्या घरामागे पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच आझाद मैदानावर शेड उभारणे . 9)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.3 मधील रूउफ खान ते तसलीम मिस्तरी रस्ता काँक्रीटीकरण करणे. 10)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.4 मधील इशाक खान ते रेणुका मंदिरापर्यंत सुशोभिकरण करणे 11)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.4 मधील बहादूर खान ते रशीद खान ते बिलास वाडी ते गुलाब गोस ते इब्राहीम मोजम यांच्या घरापर्यंत सुशोभिकरण करणे 12)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.4 मधील अजित पटेल ते मराठवाडी पर्यंत सुशोभिकरण करणे 13)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.6 मध्ये भुसावळ नाका ते संजू सुरवाडे यांच्या गटार/ नाला बांधकाम करणे नाल्यापर्यंत गटार बांधकाम करणे. 14)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.7 मधील आर सी सी गटार बांधकाम करणे. 15)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.12 मध्ये बाळू श्रीखंडे ते बाळू सोनार , शिवाजी मराठे ते अवसू पाटील व सुधाकर पाटील ते काशिनाथ पाटील आणि दीपक पवार ते शिवा यांचे घरापर्यंत 4 इंची पाईप लाईन टाकणे करणे.
    16)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.12 मध्ये पर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे. 17)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.13 मध्ये सावळे ते एफ आर पाटील ते दीपक चौधरी यांच्या घरासमोर व सावळे यांचे घरासमोर ते तेल गोटे यांचे घरापर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे. 18)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र14 मध्ये बडगुजर गुरुजी ते देविदास सापधरे व वसंत तळेले ते बोदवड रोड पर्यंत तसेच बोरोले इंजिनियरिंग ते बोदवड रोड पर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे. 19)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.15 मधील महाजन ते पोहेकर दुतर्फा आर सी सी गटार बांधकाम करणे. 20)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.15 मधील कासोदे ते किशोर वानखेडे आर सी सी गटार बांधकाम करणे.
    21)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.17 मध्ये रामदास झांबरे ते संजय बोरसे ते राजेंद्र हिवराळे ते महाजन पंपा बोदवड रोड पर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे. 22)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.17 मध्ये संदीप चौधरी ते भोई ते मराठा समाज ओपन स्पेस घेवून बोदवड रस्त्या पर्यंत दुतर्फा आर सी सी गटार बांधकाम करणे. 23)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.13 श्री. श्रीखंडे गुरुजी ते विकास सोनवणे यांच्या घरापर्यंत आर.सी.सी गटार बांधकाम करणे.
    24)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील विजय जैन (अलंकार एम्पोरियम) ते राजू वाढे यांच्या घरापर्यंत आर.सी.सी गटार बांधकाम करणे. 25)मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.13 मध्ये संत गोरा कुंभार कॉलनीतील संतोष इलेक्ट्रॉनिक ते राजू वाढे व पारसशेठ जैन ते आशीर्वाद इले.बोदवड रोड पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 26)बोदवड नगरपंचायत हद्दीतील नगरपंचायत मालकीच्या जागेवर श्री. संत जगनाडे महाराज सांस्कुतिक सभागृह बांधकाम करणे. 27)बोदवड नगरपंचायत येथे प्रभाग क्र.1 मध्ये संत सेना महाराज सभागृहास संरक्षण भिंत बांधकाम करणे. 28) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.1 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे. 29)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.5 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे. 30)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.6 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे.
    31)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.9 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे. 32)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.10 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे. 33)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.11 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे. 34)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.12 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे. 35)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.13 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे. 36)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.16 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे. 37)बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.17 मध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे.
    38)सावदा नगरपरिषद हद्दीत गट नं.97 मधील खुल्या जागेत सांस्कुतिक सभागृह बांधकाम करणे . 39)सावदा नगरपरिषद हद्दीतील खुल्या जागा विकसित करणे . 40)सावदा नगरपरिषद हद्दीतील रजा नगर येथील दुतर्फा आर सी सी गटार बांधकाम करणे 41)सावदा नगरपरिषद हद्दीतील गौसियानगर मध्ये ओपन स्पेस विकसित करणे 42)सावदा नगरपरिषद हद्दीतील इदगाह मध्ये काँक्रीटीकरण करणे 43)सावदा नगरपरिषद हद्दीतील रजा नगर मध्ये काँक्रीटीकरण करणे
    44)सावदा नगरपरिषद हद्दीतील शहीद अब्दुल चौक सुशोभीकरण करणे 45)सावदा नगरपरिषद हद्दीतील साई पार्क पासून ते गट नं. 61 राजू पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रीटीकरण करणे 46)सावदा नगरपरिषद हद्दीतील लोटन चौधरी यांचा प्लॉट , स्वामी हॉस्पिटल ते हायवे पर्यंत काँक्रीटीकरण करणे 47)सावदा नगरपरिषद हद्दीतील खंडोबा महाराज देवस्थान जवळ संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे . 48)सावदा नगरपरिषद हद्दीतील गट नं.1456 सावदा स्टेशन रोडवर शांतीसेठ गुजराथी ते महेश निमगडे यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे .
    49)सावदा नगरपरिषद हद्दीतील गट नं 1456 ते गट नं.1479 पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे . 50)सावदा नगरपरिषद हद्दीतील गट नं 1569 ते गट नं.1546 पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे . 51)सावदा नगरपरिषद हद्दीतील रेस्ट हाउस समोरील रिंग रोड ते गट नं 98/99 पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे . 52)सावदा नगरपरिषद हद्दीतील रजा नगर व पनापीर रस्ता व आर सी सी गटार बांधकाम करणे .
    53)सावदा नगरपरिषद संचालित नाना हरी पाटील कन्या शाळा येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे व सुशोभीकरण करणे. 54)सावदा नगरपरिषद हद्दीतील गट नं 1225 जाम मळ्या मधील 300 मीटर आर सी सी गटार बांधकाम करणे. 55)सावदा नगरपरिषद हद्दीतील गौसिया नगर येथील वाहेद खान यांच्या घरापासून ते नुरा ड्रायव्हर यांच्या घरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण करणे. 56)सावदा नगरपरिषद हद्दीतील वाहेद खान यांच्या घरापासून ते नुरा ड्रायव्हर यांच्या घरापर्यंत 500 मीटर आर सी सी गटार बांधकाम करणे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    2026 Calendar : जळगाव जनता सहकारी बँकेच्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे विमोचन

    December 19, 2025

    MahaVitaran Employees : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्नेहसंमेलनामुळे ‍मिळाली नवी ऊर्जा

    December 19, 2025

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.