चोपडा – प्रतिनिधी
जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगाव म्हणजेच ग.स. च्या चोपडा शाखेच्या शाखाधिकारी पदावर जगन्नाथ तुळशीराम बाविस्कर (गोरगावले बु.) यांची नियुक्ती करण्यात आली. सहकार नेते व संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.बी.बी.पाटील यांनी सन १९८९ मध्ये बाविस्कर यांची भडगाव शाखेवर लिपीक म्हणुन नियुक्ती केलेली होती. त्यानंतर त्यांनी अमळनेर, यावल व एरंडोल येथेही चांगल्या प्रकारे सेवा बजाविली. सध्या ते शाखा चोपडा नं.५ येथे उपशाखाधिकारी पदावर कार्यरत होते. मुख्य कार्यालयाचे आदेशान्वये सेवा जेष्ठता व शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना शाखा चोपडा नं.५ येथेच शाखाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील, समस्त संचालक मंडळ, व्यवस्थापक वाल्मिकराव पाटील, मुख्य कार्यालय स्टाफ् सोसायटी व हितकारणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, विभागीय व वसुली अधिकारी यांचेसह चोपडा शाखेचे अधिकारी कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
