Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»निपुण भारत हा विद्यार्थी केंद्री उपक्रम – आ. मंगेश चव्हाण
    चाळीसगाव

    निपुण भारत हा विद्यार्थी केंद्री उपक्रम – आ. मंगेश चव्हाण

    SaimatBy SaimatApril 1, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 
    शिक्षकांच्या शिकवणुकीमुळे मला कधीही व्यसनाने शिवले नाही. शिक्षक हे समाजाचे खरे आदर्श असतात. चाळीसगाव तालुक्यात अनेक शिक्षक चांगल्या संकल्पना मांडत असतात. त्यांचेही अभिनंदन असे मनोगत  पंचायत समिती शिक्षण विभाग व कृतिशील शिक्षण मंच यांच्या यांच्या संयोजनाने तालुकास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन राजपूत मंगल कार्यालय येथे आ. मंगेश चव्हाण यांनी केले.
    तालुक्यात गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या संकल्पनेतुन व गट शिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या माध्यमातून शाळांसाठी B- plus  अंतर्गत बाला उपक्रमाचे उदघाटन आ. मंगेश चव्हाण यांनी केले. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी नंदकिशोर वाळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून विकास पाटील हे उपस्थित होते.
    विलास भोई गटशिक्षणाधिकारी व नंदकुमार वाळेकर यांनी बाला उपक्रम शाळेत कशा पद्धतीने सुरू आहे. याचे कामकाज पीपीटी द्वारे मांडले. शिक्षकांनी केलेल्या कामाने आ. मंगेश चव्हाण भारावले व  दरवर्षी 50 लाख रु.फंडातून शाळांसाठी देण्याची घोषणा केली. शाळेच्या भौतिक सुविधा सुधारणे कामी केव्हाही मदतीस तत्पर राहील अशी ग्वाही दिली.
    शिक्षणअधिकारी विलास पाटील यांनी सीईओंच्या संकल्पनेतून गटविकास अधिकारी नंदकिशोर वाडेकर स्वयम् प्रेरणेतून जिल्ह्यातून चाळीसगाव तालुक्यात बाला च्या माध्यमातून शाळा विकास करण्याचा आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त केली. तदनंतर गटविकास अधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणातून अगदी शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मॉडेल स्कूल मधून शिक्षण मिळण्या कामी तालुक्यातून प्रथम दोन शाळांनी पूर्तता केल्यानंतर पुढील टप्प्यात 50 टक्के शाळा बाला उपक्रमातून परिपूर्ण होतील. प्रत्येकाच्या मानसिकतेला वळवण्याची कला माझ्यात आहे आणि ते मी प्रत्येक शिक्षकाकडून बाला उपक्रमाचे काम पूर्ण करून घेईल.स्वतःचा केव्हाही तुमच्यात काम करण्यासाठी मी सदैव उपस्थित राहील असा विश्वास दिला.
    मान्यवरांच्या प्रेरणात्मक शक्तीने चाळीसगाव विकास गटातील शिक्षक वृंदानी चाळीसगाव तालुक्यात असा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. याकामी गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी प्रेरणा सभा घेण्यापासून तर शेवटच्या घटकापर्यंत तुमच्याबरोबर राहू असा विश्वास व्यक्त केला.  सूत्रसंचालन भैय्यासाहेब वाघ यांनी केले. तर यशस्वीतेसाठी लक्ष्मण चव्हाण, महेंद्र सिसोदे, रामदेव राठोड, शिक्षण विभागाचे पंकज रणदिवे व कृतिशील शिक्षक मंच यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’चे संकेत? भाजप मित्रपक्षांवरच डाव साधणार असल्याचा बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    April 12, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.