Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»तरुण-तरुणीने विष घेतल्याने मृत्यू
    क्राईम

    तरुण-तरुणीने विष घेतल्याने मृत्यू

    SaimatBy SaimatFebruary 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    तमाशा मंडळातील तरुणी व तरुणाने विषारी प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पारोळा शहरात घडली. अंजली अशोक नामदास (वय २०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे (वय १९, रा. अंजाळे, ता. यावल) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
    भिका-नामा तमाशा मंडळ हे धुळे जिल्ह्यातील बाबुळवाडी येथून येथे दि. २४ रोजी दुपारी तमाशाचे काम आटोपून दुसऱ्या ठिकाणी जात होते. पण पारोळा शहरातील कजगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ वाहन नादुरुस्त झाल्याने थांबले होते. तमाशा मंडळातील तरुणी अंजली अशोक नामदास व योगेश उर्फ सुनील नामदेव बोरसे हे दोन्ही तमाशा मंडळातच काम करतात.
    दोघे बाजारात जाऊन येतो, असे सांगून निघून गेले. ते लवकर न आल्याने मंडळातील अन्य सहकाऱ्यांनी शोध घेतला. तेव्हा ते बाजारात होते. त्यावेळी त्यांना विचारपूस केली असता एवढा वेळ का लागला? त्यांनी सांगितले की आम्ही दोघांनी काहीतरी विषारी औषध सेवन केला आहे, असे सांगितले.
    दरम्यान, दोघांना सहकाऱ्यांनी लगेच एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर २५ रोजी पुढील उपचारार्थ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. तेव्हा अंजलीची प्राणज्योत दुपारी दोनला मालवली, तर योगेशचा सायंकाळी सहाला मृत्यू झाला. याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिसात खबर दिली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.