फालीतील नव शेतकरी व संशोधकांना उद्योग क्षेत्र मदत करणार – युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ

0
39

जळगाव ः प्रतिनिधी
‘फाली सारख्या संस्थांच्या माध्यमातून भारतातील भविष्यकालिन शेतीत संशोधनाची दिशा निश्‍चित होत आहे. फालीच्या संमेलनातून युवा शेतकरी, संशोधक आणि नव उद्योजक समोर येत आहे. अशा घटकांना युपीएलसारखे उद्योग शिष्यवृत्ती व लघुउद्योग निर्मितीसाठी मदत करतील असे प्रतिपादन युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी केले.
‘फालीच्या उपक्रमामुळे शेतीकडे नव पिढी वळते आहे. शेतीतील नव संशोधन हे सर्वच उद्योगांसाठी पूरक आहे. शेतीला नवी दिशा देण्याचा संकल्प सर्वांनी करायला हवा. आपले कुटुंब आणि आपला परिवार शेतीमय करण्याचा प्रयत्न केला तर देशातील शेतीची प्रगती उत्तम होईल असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन म्हणाले.’ ‘फाली’च्या आठव्या संम्मेलनाच्या पहिल्या सत्राच्या समारोपात मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना मेडल, ट्रॉफी, फाली जाकिट देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर युपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ, उपाध्यक्ष सान्ड्रा श्रॉफ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, फालीच्या संस्थापिका नॅन्सी बेरी, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन,गोदरेज अग्रोवेटचे यूपीएलचे आशिष डोभाल, अमोल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
जैन हिल्स येथे आयोजित ‘फाली’च्या आठव्या संम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी 67 शेती व्यवसाय योजना आणि 67 नावीन्यपूर्ण उपकरणांविषयी सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या दोन्ही सादरीकरणातून जे अव्वल ठरलेल्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व्यवसाय योजना तसेच नाविन्यपूर्ण शेती उपकरणांमध्ये पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली.
अशोकभाऊ जैन यांनी प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपात विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, ‘तुमच्या नावीण्यपूर्ण व्यवसाय योजना आणि तंत्रज्ञान सादरीकरण स्पर्धेमुळे मी खूप प्रभावीत झालो आहे. आम्ही इथे पाहिले की, फाली विद्यार्थ्यांनी स्वप्ने पाहिली आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपयोगी तांत्रिक नावीण्य असलेली उत्पादने निर्माण केली.फाली उपक्रमात तुमच्यात ज्ञानाची ज्योत जागृत करण्याची क्षमता आहे हे आम्हाला माहित आहे. तुम्हाला ॲग्रीकल्चर एज्युकेटर्स (एई) म्हणजेच कृषी शिक्षकांनी तुम्हाला व्यवहार ज्ञान दिलेच आहे आणि तुम्ही वास्तवातील आधुनिक व शाश्‍वत शेतीसाठी जोखीम घेणे हे पण समजून घेतले आहे. ही भविष्यातील शेतीत काम करण्याची क्षमता ठेवणाऱ्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो.’ असे महत्त्वपूर्ण विचार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी आपल्या मुख्य भाषणातून व्यक्त केले.
माजी फाली विदयार्थ्यांसाठी फाली उपक्रम काही कार्यक्रम विकसित करत आहे याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही कधीतरी समाजाला काही परत द्याल. तुमच्यापैकी काही जण पुढे ॲग्रीकल्चर एज्युकेटर्स (एई) म्हणजेच कृषी शिक्षक व्हाल. तुमच्यापैकी काही जण यशस्वी शेतकरी व्हाल किंवा भावी फाली विदयार्थ्यांना पाठिंबा देणारे व पुरस्कृत करणारे उद्योजक म्हणून कार्य कराल. हेच जीवनाचे वर्तुळ आहे असे मला वाटते.
यावेळी जैनफार्म फ्रेशफूडचे संचालक अथांग जैन यांनी मार्गदर्शन केले. ‘जे काम हाती घ्याल ते उत्तम गुणवत्तेचे तर करावेच परंतु त्यात आपण अव्वल कसे असू हा दृष्टीकोन नक्की ठेवावा. त्यासाठी माझ्या आजोबांचे उदाहरण तुमच्यासमोर देतो. आजोबांकडे दूरदृष्टी होती आणि त्यांच्याकडे स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची क्षमता आणि सहनशीलता होती. तुम्ही टिश्‍यूकल्चर विभागाला भेट दिली असेल व तिथले कामकाज बघितले असेल.भवरलालजी जैन उत्पादनाच्या गुणवत्तेवर भर देत असत आणि त्यांच्या दृष्टीने उत्पादन चांगल्या गुणवत्तेचे निर्माण करणे बरोबर होते.’ असे मोलाचे विचार अथांग जैन यांनी व्यक्त केले.
.नावीन्यपूर्ण (इन्होवेशन) शेती
उपकरणांमधील विजेते
सॉईल मोईश्‍चर ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टीम, भारत माता विद्यालय मायनी, सातारा (प्रथम), स्मार्ट इरिगेशन सिस्टीम, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे, (द्वितीय), अग्रिकल्चर मल्टिपर्पज इम्पिमेंट, श्रीराम विद्यालय नांदगोमुख नागपूर (तृतिय), मल्टिपल बेनिफीट टूल, रावजी फते विद्यालय खराशी पुणे (चतुर्थ), फर्टिलायझर एप्लिकेटर महात्मा गांधी विद्यालय कर्जत (पाचवा) हे विजेते ठरले.
व्यवसाय (बिझनेस) योजनामधील विजेते
केळी संदर्भातील उत्पादन, सातपुडा विद्यालय लोणखेडा, नंदुरबार (प्रथम), बायोइंजायम गोल्डन लिक्वीड, हिरकणी विद्यालय गावडेवाडी पुणे (द्वितीय), जिरेनियम ऑईल प्रॉडोक्शन कुलस्वामिनी खांदेराई विद्यालय हिवरे, पुणे (तृतीय), इंडिग्रेटेट फार्मिंग सिस्टीम्स, महात्मा गांधी विद्यालय कर्जत, अहमदनगर (चतुर्थ), बेकरी प्रोडक्ट, श्री पंढरीनाथ विद्यालय पोखरी पुणे (पाचवा) हे विजेते ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here