पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आल्यामुळे महसुलाच्या उत्पन्नात वाढ होणार

0
2

फैजपूर  प्रतिनिधी

यावल रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वर्ग अ जमीन शेत  पोटखराब असलेलं क्षेत्र  असल्याने तो पोटखराब दुरुस्त करून लागवडीखाली आणल्यास  शेताच्या उत्पन्नात वाढ होईल, शेतीचे कर्ज मिळेल, नैसर्गिक आपत्ती झाल्यास भरपाई मिळू शकते. आपल्या शेताची पोटखराब क्षेत्र दुरुस्त केल्याने किमतीत वाढ होते. पोटखराब क्षेत्र दुरुस्ती मुळे शासनाचा महसूल वाढतो. बागायती असल्यास जास्त लाभ मिळू शकतो. त्यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी पोटखराब क्षेत्र दुरुस्त साठी जवळच्या तलाठी कार्यालयात अर्ज सादर करावा व सदर च क्षेत्र दुरुस्ती करून लागवडीखाली आणावे असे आवाहन फैजपूर प्रांत कैलास कडलग यांनी केली आहे.

यात  हंबर्डी जमीन 1.85, शेतकरी 72, मारूळ जमीन 2.55, शेतकरी 49, उंटावद जमीन 0.38, शेतकरी 11, नावरे.0.88,शेतकरी 8, वाघझिरा 0.51, शेतकरी 5, महेलखेडी 0.22,शेतकरी 7, सातोद 0.4,शेतकरी 2,  चितोडा 0.12, शेतकरी 5, डो कठोरा,0.98,शेतकरी 10, डोणगाव 0.9,शेतकरी 7, दहिगाव 0.63,शेतकरी 9, सांगवी 1.35,शेतकरी 17 या गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपले पोट खराब दुरुस्त करून लागवडीखाली आणले. उताऱ्यातील पोटखराब क्षेत्र दुरुस्ती आदेशावर  प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी शुक्रवारी शिक्कामोर्तब करून मंडळाधिकारी यांचेकडे आदेश गाव निहाय पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here