जामनेरातील इंदिराबाई ललवाणी विद्यालयात ‘योग साधना’

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. येथील विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी योग साधनेस प्रारंभ झाला. प्रार्थना, ओमकार यांच्यासह योगाचे विविध धडे योग शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच ‘करो योग, रहो निरोग’ असे योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन. मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक व्ही.जी. महाजन, जी.जे.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. योग दिन कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभागप्रमुख जी.सी.पाटील यांनी केले होते. यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक प्रा.समीर घोडेस्वार तर आभार बी.पी.बेनाडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here