अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी नितीन मरसाळे

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील शासकीय विश्रामगृहात अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात स्मारक समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन अध्यक्षपदी नितीन मरसाळे, उपाध्यक्षपदी गजानन चंदनशिव तर सचिवपदी रवींद्र खैरनार यांची सर्व समाज बांधवांच्यावतीने सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीला सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्मारक समितीच्या उर्वरित कार्यकारिणीत सहसचिव कल्पना शेजवळ, कार्याध्यक्ष अण्णा कांबळे, संपर्क प्रमुख रवींद्र कालोंखे, कोषाध्यक्ष सुभाष पगारे, उपकोषाध्यक्ष निलेश खरात, संघटक निलेश शिरसाठ, प्रसिध्दी प्रमुख अजय पाखरे, समन्वयकपदी राहुल मरसाळे, मनोज नावगिरे, गजानन हतांगडे तर सदस्यांमध्ये प्रशांत शिरसाठ, भूषण मरसाळे, अक्षय शिरसाठ, लकी शिरसाठ, सोनु साळवे, वंश साळवे, संदीप मरसाळे, योगेश शिरसाठ, गौरव शिरसाठ, सचिन शिरसाठ, राज मरसाळे, प्रदीप कांबळे, लालचंद कोतकर, दादाभाऊ जाधव, संतोष नवगीरे यांचा समावेश आहे. शेवटी आभार सुभाष पगारे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here