Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»चोपडा महाविद्यालयात युवती सभेच्या ऋतुमती अभियानाअंतर्गत कार्यशाळा यशस्वी
    चोपडा

    चोपडा महाविद्यालयात युवती सभेच्या ऋतुमती अभियानाअंतर्गत कार्यशाळा यशस्वी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoFebruary 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चोपडा : प्रतिनिधी

    येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय आणि जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभेच्या ऋतुमती अभियानाअंतर्गत शुक्रवारी, १६ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी होते. वक्त्या म्हणून डॉ. योगिता काटे, समुपदेशन तज्ज्ञ उज्ज्वला पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार, युवतीसभा प्रमुख डॉ. प्रिती रावतोळे, डॉ. क्रांती क्षीरसागर उपस्थित होते.

    कार्यक्रमास महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांचेही मार्गदर्शन लाभले. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्री कै. ना. शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन तसेच दीपप्रज्ज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

    पहिल्या सत्रात डॉ. योगिता काटे यांनी युवतींच्या समस्या तसेच तारुण्यात होणारे शारीरिक बदल व आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी पीसीओडी, थायरॉईड, हार्मोनल इंबँलेंस, इन्सुलिन रेझिटंस, मधुमेह आजारांची लक्षणे व उपायावर मार्गदर्शन करत मुलींशी चर्चा करून त्यांचे प्रश्‍न व समस्यांचे निराकरण केले.

    दुसऱ्या सत्रात समुपदेशन तज्ज्ञ उज्ज्वला पाटील यांनी युवतींची एकाग्रता व संयम तपासणी आणि वाढविण्यासाठी मनोरंजन खेळाद्वारे मार्गदर्शनास सुरुवात केली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

    कार्यशाळेला अश्‍विनी सूर्यवंशी, पूजा पून्नासे, आशा शिंदे, शाहीन पठाण, जागृती पाटील, रश्‍मी जैन, कीर्ती अग्रवाल, भाग्यश्री सांगोरे, कल्याणी मांडेवाल, मयूरी पाटील यांच्यासह विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ. संगीता पाटील, आर.पी. जैस्वाल, वैशाली सोनगिरे, हर्षा देवरे, प्राजक्ता वानखेडे, पूनम जैन, पूजा पाटील, पूजा सोनवणे, दर्शन पाटील, नीलेश भाट, विशाल बोरसे यांनी परिश्रम घेतले. वक्त्यांचा परिचय डॉ. क्रांती क्षीरसागर, आरती पाटील यांनी करून दिला. प्रास्ताविक डॉ. प्रिती रावतोळे, सूत्रसंचलन अश्‍विनी जोशी तर आभार पूजा पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.