चंदीगड :
पत्नीची साडी चोरली म्हणून एकाने शेजाऱ्याची गोळी झाडून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ही घटना उघडकीस आली आहे. यात साडी चोरीच्या संशयामुळं सिक्युरीटी गार्डने शेजाऱ्याची गोळी झाडून हत्या केली आहे. मयतदेखील सिक्युरिटी गार्ड होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा मुळचा बिहारचा असून त्याचे नाव पिंटू कुमार असं आहे. ज्या इमारतीत पिंटू राहत होत्या त्याच्या बाजूच्यात खोलीत उत्तर प्रदेशचा अजय कुमार (४२) त्याची पत्नी रीनासोबत राहत होता. पिंटू आणि अजय दोघही सिक्युरिटी गार्डम्हणून काम करत होते.
साडी चोरल्याच्या संशय
१५ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. अजय कुमार त्याची ड्युटी संपवून रात्री ८ वाजता घरी परतला होता. तेव्हा अजयची पत्नी रीनाने त्याला शेजारी राहणाऱ्या पिंटूने तिची साडी चोरल्याची तक्रार केली. पत्नीच्या तक्रारीनंतर अजय पिंटूसोबत बोलण्यासाठी गेला. अनेकदा विचारुनही पिंटूने साडी चोरण्याचा आरोप फेटाळत राहिला. या घटनेवरुन दोघांमध्ये वाद वाढीस लागला. दोघेही भांडू लागला. त्यानंतर संतापाच्या भरात अजय त्याच्या खोलीत गेला आणि आतून बंदूक घेऊन आला आणि त्याच बंदूकीने त्याने पिंटूच्या पोटात गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि रुममेट अशोक कुमार यांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा अजय बंदूक आणण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला तेव्हा आम्ही त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही त्याच्या हातातून बंदूक हिसकावून गेली. मात्र, संतापाच्या भरात अजयने पुन्हा बंदुक हिसकावली आणि पिंटूच्या पोटात गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर पिंटू गंभीर जखमी झाला होता.
उपचारादरम्यान पिंटूचा मृत्यू
पिंटूला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पिंटूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अजयला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्याच्या विरोधात पोलिस स्थानकात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसंच, आरोपी अजय कुमारकडे असलेल्या बंदुकीचा परवानादेखील जप्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणात पुढील चौकशी करत आहेत.