‘Vande Mataram’, ‘Bharat Mata Ki Jai…’ : ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय…’च्या घोषणांनी पिंप्राळा दणाणले

0
23

भाजप महाराणा प्रताप मंडळातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पदयात्रा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय…’असा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करत देशप्रेमींनी हाती तिरंगा घेत, महापुरुषांच्या घोषणा देत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी भाजप महाराणा प्रताप मंडळ क्रमांक ५ तर्फे काढण्यात आलेल्या पदयात्रेने पिंप्राळावासियांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे स्फुल्लिंग पेटविले. पदयात्रेचा समारोप महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नतमस्तक होऊन करण्यात आला.

पिंप्राळा उपनगरातील भाजप महाराणा प्रताप मंडळातर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजेला ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मंडळाध्यक्ष अतुल बारी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा नितू परदेशी, माजी नगरसेविका शोभा बारी, रेखा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य शिवस्मारकापासून पदयात्रा काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here