साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरविणारा भारत हा विश्वातील एकमेव देश ठरला आहे. बुधवारी ‘चांद्रयान-३’ मोहीम फत्ते झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली आहे. गुरुवारी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयात विद्यार्थ्यांनी जल्लोष करतांना मानवी साखळीने भारताचा नकाशा साकारुन जल्लोष केला. यावेळी चिमुरड्यांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून टाकला. मोहीम यशस्वी झाल्याने विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला.
मुख्याध्यापिका मंजुषा नानकर, ज्येष्ठ शिक्षक जिजाबराव वाघ यांनी मोहिमेची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यशस्वीतेसाठी त्रिशला निकम, अनिल महाजन, राजश्री शेलार, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख अजयराव सोमवंशी, सचिन चव्हाण, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, दीपाली चौधरी, ज्योती कुमावत, कविता साळुंखे, रंजना चौधरी, रेखा चौधरी, सचिन पाखले यांच्यासह दत्तात्रय गवळी, राहुल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
चंदामामा अब दूर नही…
चांद्रयान मोहिमेची माहिती स्वतः विद्यार्थ्यांनी दिली. २ री ‘फ’ मधील अमित कमलेश चौधरी, स्वामी सुनील आगोणे, महेश रवींद्र वाघ, मनस्वी शितल बिऱ्हारे यांनी चांद्रयान मोहिमेची माहिती सांगत भारतमातेचा जयजयकार केला. ‘चंदामामा अब दूर नही…बस एक टूर के है…’असा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरुन ओंसाडून वाहत होता. उपक्रमाचे संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, आ.बं.मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल आदींनी कौतुक केले.