सोनी नगरात दहीहंडी फोडणारा चिमुकला पियुष पाटील ठरला ‘गोविंदा’

0
5

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीसह दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सोनी नगर परिसरातील युवकांनी गुरुवारी दहीहंडीला फुगे बांधून सजविण्यात आले होते. रात्री ८ वाजेपासून युवकांच्या गोविंदा पथकांनी तीन थर रचून दहीहंडीला फोडण्याचा प्रयत्न वारंवार करत होते. अखेर पियुष पाटील या चिमुकल्या गोविंदाने दहीहंडी फोडण्यात यश मिळविले. यावेळी सोनी नगर परिसरातील युवकांचे गोविंदा पथक ‘गोविंदा आला रे’…, ‘मच गया शोर सारी नगरी रे….’ या गाण्यावर डीजेच्या तालावर थिरकले.

याप्रसंगी परिसरातील महिलांनी श्री कृष्ण देवाचे विविध भजन सादर केले. नेहारिका हिने राधाच्या वेशभूषेत तयारी केली होती. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला. स्वयंभू महादेव मंदिरात दीपिका जाधव, प्रणिता पाटील, शोभाबाई धनगर, माधुरी येवले, आशा भोई, नंदिता जोशी, सुनीता राजपूत, मनीषा चव्हाण, भाग्यश्री कदम, हेमलता चावरिया, वैष्णवी पवार यांच्यासह महिला तसेच भाविक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here