दोनदा दहावी नापास पण पदरी इतरांना लाजवेल असं यश!

0
3

सोलापूर :

‘सैराट’, ‘फँड्री’ या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घातले आहे. आज या चित्रपटांना प्रदर्शित होऊन बरीच वर्षे झाली असली तरीसुद्धा हे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. नागराज मंजुळे हे नाव यामुळेच आपल्या लक्षात राहते. नागराज मंजुळे यांचा वाढदिवस आहे. २४ ऑगस्ट १९७८ साली त्यांचा जन्म कर्माळा येथे झाला. त्यांच्या चित्रपटातील विविध सामाजिक विषयांचे वास्तविक चित्रण जगासमोर आणले. २०१६ साली आलेल्या ‘सैराट’ या चित्रपटानं तर संपुर्ण जगाला वेड लावलं होतं. या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘झिंगाट’ हे गाणंही अख्ख्या जगात लोकप्रिय झाले होते. मध्यंतरी चर्चा होती ती म्हणजे नागराज मंजुळेंच्या दहावीच्या मार्कशीटची. त्यांनी आपली मार्कशीट शेअर केली होती. ज्यात ते दहावीला नापास झाले होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती.

नागराज मंजुळे यांनी फक्त ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘झुंड’ आणि ‘नाळ’ फक्त हेच चित्रपट नाहीत तर त्यांनी अनेक डॉक्यूमेंटरीजही लिहिल्याही आहेत. ज्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्येही झकळल्या होत्या. त्यातील एक म्हणजे ‘पिस्तुल्या’ आणि दुसरी म्हणजे ‘पावसाचा निबंध’ ही. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यांचे काम हे फक्त भारतापुरतेच मर्यादित नाही तर ते आंतरराष्ट्रीय पटलावरही पोहचले आहे. मागील वर्षी त्यांचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘झुंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली होती. हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित होता. या चित्रपटाला अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नव्हते. परंतु या चित्रपटातून एक वेगळी कथा आणि मांडणी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली होती. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या चित्रपटाचे समीक्षकांनीही कौतुक केले होते. त्याचसोबत या चित्रपटाला चांगले रेटिंग्सही मिळले होते.

यावर्षी त्यांचा ‘घर बंदुक बिर्यानी’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. यावेळी सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे यांनी अभिनय केला होता. त्यांच्या या चित्रपटाचेही चांगले कौतुक झाले होते. त्यांनी शेअर केलेल्या मार्कशीटमध्ये त्यांना दहावीला केवळ ३८.२८ टक्के म्हणजे ३५ टक्के पास या हिशोबानं मार्क्स मिळाले होते. त्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ७०० पैंकी २६८ मार्क्स मिळाले होते.

त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ”मी दहावीत दोनदा नापास झालो होतो. पहिल्या प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो फार तर मात्र नापास झालो म्हणून फार काही बिघडलं होतं असं मला वाटत नाही. दहावी, बारावी, एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी. परीक्षा कुठलीही असो ती अंतिम कधीच नसते. यशापयशातअसल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही”, अशी त्यांनी पोस्ट लिहिली होती. त्यामुळे त्यांची प्रचंड चर्चा रंगली होती. आणि ही पोस्ट व्हायरलही झाली होती.
१३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here