चाळीसगावात तिरंगा ध्वज पदयात्रेने लक्ष वेधले

0
24

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरात प्रथमच आ.मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ७६० फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची पदयात्रा आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान (सिग्नल पॉईंट) येथून सुरू झालेली पदयात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, करगाव रोड, अंधशाळा चौक, बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ समारोप करण्यात आला.

ढोलताशांच्या पथकाचा जल्लोष, देशभक्तीपर गीतांचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला विद्यार्थी वर्ग यामुळे पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here