भाजपाचे पहिले पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव होते

0
2

नवी दिल्ली : 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. भारताचे दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव हे जातीयवादी होते. एवढेच नाही तर भाजपाचे ते पहिले पंतप्रधान होते असा आरोप मणिशंकर अय्यर यांनी केला. मणिशंकर अय्यर म्हणाले की राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. त्यांनी राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सोनिया गांधी राजकारणात आल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं होतं. नरसिंह राव यांनी माझं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सोनिया गांधींमुळे वाचलो असेही अय्यर यांनी म्हटले आहे.

माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांचं आत्मचरित्र ‘मेमोयर्स ऑफ ए मेवरिक-द फर्स्ट फिफ्टी इयर्स’ या नावाने लिहिलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी आपले संबंध कसे होते त्यावर भाष्य केले.

राजीव गांधींविषयी काय म्हणाले अय्यर?

बाबरी मशिद पाडण्यात आली तेव्हा राजीव गांधींवर टीका केली गेली. मी त्या क्षणांचा साक्षीदार होतो. त्यावेळी परिस्थिती खूप योग्य पद्धतीने हाताळण्यात आली. मात्र पी. व्ही. नरसिंह राव हे प्रचंड जातीयवादी होते. राम रहीम यात्रेला त्यांनी संमती दिली होती. धर्मनिरपेक्षतेला त्यांचा विरोध होता. आपला देश हा हिंदू देश आहे हे तुला समजत नाही का? असं अय्यर यांनी म्हटलं आहे. तसंच माझं हे स्पष्ट मत आहे की पी. व्ही. नरसिंह राव हे भाजपाचे पहिले पंतप्रधान होते.

माझी समस्या ही होती की राजीव गांधी यांचा माझ्यावर विश्वास नव्हता. मला राजकारणाचा अनुभव नाही असे राजीव गांधींना वाटत होते. त्यांनी कधीही कुठल्याच राजकीय मुद्द्यावर माझ्याशी चर्चा केली नाही किंवा माझा सल्ला घेतला नाही. राजीव गांधी हे देशाला लाभलेले सिद्धांतवादी पंतप्रधान होते असे वक्तव्य अय्यर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here