विद्यार्थ्यांना शिक्षण गौरव पुरस्कार देऊन केले सन्मानित

0
2

जळगाव ः प्रतिनिधी

जलगाव बिल्डिंग पेंटर वेलफेयर एसोसिएशन संचलित हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेयर असोसिएशनतर्फे 11जुलै रोजी शिक्षण गौरव पुरस्कार वाटप करण्यात आले.

सर्व सन्मानित विद्यार्थ्यांना टॉफीसह छत्री, पेन, रचना उत्पत्ति एवं विकास पुस्तक आणि सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष करीमभाई सालार,मनपा विऱोधी पक्ष नेते सुनिलभाऊ महाजन,सहाय्यक पोलिस अघिक्षक कुमार चिंथा, डॉ. मिलिंद चौधरी सर, सचिन हटकर, सैयद जाकिर बिट्टू सालार आदींची विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रमास आयोजक जिल्हाध्यक्ष इस्माइलभाई खान, जिला संपर्क प्रमुख अहमदभाई खान, पिंप्राळा शाखा अध्यक्ष रोशन शाह, आसिफ खान, शैंपू पेंटर,खलील शाह, अकील बाबा, कविराज अशफाक शाह हेदेखील उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here