फैजपुरला मरीमातेच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम जल्लोषात

0
2

फैजपूर ः प्रतिनिधी
येथील मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यंदा बारा गाड्या पाहण्यासाठी आणि मरीमातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
परंपरागत पध्दतीने श्रावण महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी म्हणजे दुपारी शहरातील अंबिका देवी मंदिरात विधिवत पूजा अभिषेक होऊन न्हावी दरवाजापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जाऊन म्युनिसिपल हायस्कूलजवळील बारागाड्यांना भगत संजय कोल्हे यांनी प्रदक्षिणा घालत म्युनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक दरम्यान बारागाड्या ओढल्या. यावेळी मरीमातेचा जल्लोष करण्यात आला. कुठलाही अनुचित व अप्रिय घटना न घडता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम यशस्वी पार पडला. बारागाड्या ओढल्यानंतर भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिण बाहेरपेठ मधील मरीमातेच्या दर्शन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बारा गाड्यांच्या कार्यक्रम पाहण्यासाठी शहर तथा पंचक्रोशीतील भक्तगण नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भगत संजय कोल्हे व सहकारी बगले तुकाराम भारंबे, वासुदेव चौधरी यांनी बारागाड्या ओढल्या.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी फौजदार मोहन लोखंडे, फौजदार मकसूद्दीन शेख, फौजदार मयनिद्दीन सैय्यद, गोपनीय पोलीस योगेश दुसाने, राहुल चौधरी, सहाय्यक फौजदार रशीद तडवी, हे.कॉ. रवींद्र मोरे, अनिल पाटील, राजेश बऱ्हाटे, अमजत पठाण, रुस्तुम तडवी यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here