जे.ई.स्कूल, ज्यु.कॉलेजच्या मुलींनी सैनिकांना पाठविल्या राख्या

0
2

मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जे.ई.स्कूल आणि ज्यु कॉलेजच्या विद्यार्थिनींनी “धागा प्रेमाचा….राखी अभिमानाची” या उपक्रमाअंतर्गत एनसीसी १८ महाराष्ट्र बटालियन येथील सैनिकी विभागातील सर्व पदाधिकारी तथा सैनिकांना एम.आर.चौधरी आणि व्ही.एम.लोंढे यांच्यामार्फत राख्या व पोस्टाचे पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या.
विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक एस.आर.ठाकूर यांच्या संकल्पनेतून गेल्या ८ वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम स्वतः पत्र व राख्या आणून स्वखर्चातून ते राबवितात. विद्यार्थ्यांना पत्र लेखन हा भाग प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकविणे आणि देश रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करून वेळ प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांंना संदेश पाठविणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपक्रम शिक्षक राबवितात. जवळजवळ १०० विद्यार्थिनी यात सहभागी होऊन त्यांनी आपल्या भावना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधून व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांना आजच्या धकाधकीच्या व आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात कालबाह्य होत चाललेल्या गोष्टीची ओळख व्हावी आणि प्रत्यक्ष पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त कशा कराव्यात, यासाठी मदत होते. तसेच देश रक्षणासाठी आपल्या परिवारापासून लांब राहून देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिक भावांचे हात राखी विना राहू नये, हा उद्देश सफल होण्यास मदत होईल. यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून यात सहभागी होतात.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्राचार्य आर.पी.पाटील, उपप्राचार्य जे.पाटील, पर्यवेक्षक एस.आर.महाजन, व्ही.डी.बऱ्हाटे, एस.पी.राठोड, व्ही.बी.राणे, व्ही. डी. पाटील, एस.एस.कोळी, व्ही.एम.चौधरी, सी.डी.पाटील, एस.एम.वाढे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here