Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Crime : चूक फक्त एवढीच अन् रागाच्या भरात आचाऱ्याने चिमुकल्याला तंदूरमध्ये फेकले
    क्राईम

    Crime : चूक फक्त एवढीच अन् रागाच्या भरात आचाऱ्याने चिमुकल्याला तंदूरमध्ये फेकले

    saimatBy saimatApril 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / उत्तर प्रदेशा

    उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील छावनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. मलौली गोसाई गावात एका लग्नसमारंभादरम्यान केटरिंग कामगार आचाऱ्याने रागाच्या भरात 11 वर्षीय मुलाला पेटत्या तंदूरमध्ये फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, चमन (वय 11) हा आपल्या आजीसोबत नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. लग्नात खेळत असताना तो जेवणाच्या ठिकाणी गेला आणि तिथे ठेवलेले रसगुल्ले खाऊ लागला. याच कारणावरून केटरिंग काम करणारा आचारी संतापला.

    आरोपीने संतापाच्या भरात मुलाला पकडून थेट पेटत्या तंदूरजवळ नेले आणि त्याला तंदूरमध्ये फेकल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर लग्नसमारंभात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी तात्काळ मुलाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

    प्राथमिक उपचार अयोध्या मेडिकल कॉलेजमध्ये केल्यानंतर डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. सध्या मुलगा चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत गंभीर भाजल्याने मृत्यूशी झुंज देत आहे.

    घटनेनंतर आरोपी आचारी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या नातेवाईकांनी छावनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Crime : संशयातून सुटला रागाचा कहर! पतीचा पत्नीवर अमानुष हल्ला, पाय कापून थेट पोलीस ठाण्यात हजेरी

    April 17, 2026

    समृद्धी महामार्गावर मृत्यूचा सापळा; शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा भीषण अपघातात मृत्यू

    April 17, 2026

    Jalgaon : नांद्रा खुर्द येथे धक्कादायक घटना आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.