Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»‌‘इंडिया‌’च्या मुंबई बैठकीला येणाऱ्या नेत्यांचं तुतारी,ढोल वाजवून स्वागत
    मुंबई

    ‌‘इंडिया‌’च्या मुंबई बैठकीला येणाऱ्या नेत्यांचं तुतारी,ढोल वाजवून स्वागत

    SaimatBy SaimatAugust 24, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, मुंबई : प्रतिनिधी

    विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईत होणाऱ्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या बैठकीला येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने म्हणजे तुतारी आणि नाशिक ढोल वाजवून नेत्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. तसेच ३१ ऑगस्ट रोजी दुपारी आणि रात्रीच्या जेवनात मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी असेल. यामध्ये पुरणपोळी, झुणका भाकर, वडा पाव या पदार्थांसह इतर मराठी पदार्थांची रेलचेल असणार आहेत.

    इंडिया आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. बैठकीत सर्व पक्षांशी समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. एकूण अकरा जणांची ही समिती असणार आहे. कोणत्या विषयावर इंडिया आघाडी भूमिका मांडेल, यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार आहे. तसेच इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भातही चर्चा होणार आहे.

    रात्रीचे जेवण ठाकरे गटाकडून दिले जाईल
    ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून इंडिया आघाडीची बैठक सुरू होईल. बैठक संपल्यानंतर रात्री ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेत्यांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील सांताक्रूझ-कलिना परिसरातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भाजप विरोधकांची डिनर डिप्लोमसी होईल.

    दुपारच्या जेवणाची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे
    दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विरोधी पक्ष आघाडी ‘इंडिया’ची बैठक सुरू होईल. या दिवशीच्या नेत्यांच्या लंचची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आली आहे. १ सप्टेंबरला काँग्रेस पक्षाकडून नेत्यांच्या लंचचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

    अजेंडा काय असणार?
    मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत ‘इंडिया लोगो’ लॉिंन्चग करण्यात येणार आहे. याव्ोळी इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील अणि इतर राज्यातील कोणते स्थानिक प्रश्न जाहीरनाम्यात घ्यायचे यावर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी हयात हॉटेल मधील १७५ खोल्या नेत्यांसाठी बुक करण्यात आल्या आहेत. विविध राज्यातून ६० ते ६५ नेत उपस्थित असणार आहेत. दरम्यान, विरोधकांच्या बैठकीआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची ३० ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. या व्ोळी इंडिया आघाडीच्या बैठकीविषयी महाविकास आघाडीने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.

    बैठकीचं नेतृत्व ठाकरे गटाकडे
    इंडिया आघाडीची बैठक आयोजनाची मुख्य जबाबदारी ही शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष समन्वयाने आयोजनाच्या तयारीला लागले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

    नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी राष्ट्रवादीकडे
    मुंबईत होणाऱ्या बैठकीला देशपातळीवरील विरोधी पक्षांचे नेते येणार आहेत. देशभरातील विरोधी पक्षात असलेले २६ पेक्षा अधिक पक्ष हे या बैठकीला हजर राहणार आहेत. यामध्ये देशातील पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समाव्ोश असणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे देण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Air India flights cancelled : इराण संघर्षामुळे एअर इंडियाचे २,५०० उड्डाणे रद्द; विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला

    March 23, 2026

    jalgaon : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; जळगाव मार्गावर धावणार अतिरिक्त गाड्या

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.