यावलला सिद्धार्थनगरातील जीर्ण समाज मंदिर तात्काळ बांधावे

0
16

साईमत, यावल : प्रतिनिधी

येथील सिध्दार्थनगरमधील समाज मंदिराची अवस्था अतिशय जीर्ण झालेली आहे. समाज मंदिराची अवस्था इतकी जीर्ण झाली आहे की, त्यामुळे केव्हाही जीवितहानी होऊ शकते. समाज मंदिरात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम नेहमी होतात. त्यामुळे लवकरात लवकर नवीन समाज मंदिर शासनाच्या दलित वस्ती निधीतून किंवा शासनाच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून किंवा यावल नगरपालिकेचे मागासवर्गीय ५ टक्के निधीतून तळ मजला, पहिला मजला आणि दुसरा मजला असे तात्काळ बांधुन मिळावे, अशी मागणी समस्त बौध्द समाजाच्यावतीने लेखी निवेदन देऊन केली आहे. अशा आशयाचे लेखी निवेदन जळगावचे जिल्हाधिकारी, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी, यावलच्या तहसीलदार, यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनाही दिले आहे.

निवेदनावर माजी नगरसेवक विजयकुमार गजरे यांच्यासह कुलदीप गजरे, कैलास मेढे, शुभम गजरे, संतोष पारधे, अर्जुन अडकमोल, निलेश भालेराव, जगदीश बिऱ्हाडे, आकाश बिऱ्हाडे, मालता बिऱ्हाडे, आशा बिऱ्हाडे, मुरलीधर बिऱ्हाडे, शोभा बिऱ्हाडे, तेजस्विनी बिऱ्हाडे, मधुकर बिऱ्हाडे, करण अडकमोल, पवन पारधे, गौतम पारधे, गणेश गजरे, अमृत गजरे, रुपेश गजरे यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here