साईमत, प्रतिनिधी, जळगाव
पिंप्राळा येथील मनपा क्षेत्रातील मुस्लिम कब्रस्तानमधील काँक्रिट पाथ-वेच्या पूर्ण झालेल्या कामाची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पाहणी केली. यावेळी सदरचे काम समाधानकारक केल्याचे आढळून आले. प्रभागातील नागरिकांनी आयुक्त डॉ. गायकवाड यांची भेट घेऊन काम चांगले केल्याबद्दल समाधान व्यक्त केली.
तसेच गणपतीनगरातील आरसीसी गटार बांधकामाची देखील आयुक्तांनी यावेळी पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी रस्त्यांची कामे त्वरित करून मिळावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केली.