मोहम्मद शमीची दुसरी ‘बेगम’ होण्यासाठी अभिनेत्री तयार

0
2

मुंबई : प्रतिनिधी

मोहम्मद शमी हा आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. या वेगवान गोलंदाजाने भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत अवघ्या चार सामन्यांमध्ये १६ बळी घेतले.सुरुवातीचे काही सामने टीम मॅनेजमेंटने शमीला बाकावर बसवून ठेवले होते, मात्र आता शमीची कामगिरी अशी आहे की, त्याला बाकावर बसवण्याचा विचारही कर्णधार करणार नाही. शमीची गोलंदाजी सर्वोत्तम ठरली आहे. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध त्याने पाच षटकांत १८ धावा देऊन पाच बळी घेतले, तेव्हा तर सर्वजण शमीचे जबर फॅन झाले.शमीचा विश्वचषकातील उत्कृष्ट फॉर्म भारताच्या वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नाच्या अधिक जवळ नेतो आहे. दरम्यान मैदानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शमीचे वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त राहिले आहे. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय, कारण चक्क एका अभिनेत्रीने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. अभिनेत्री पायल घोषने शमीशी लग्न करण्यासंदर्भात ट्वीट केले असून यानंतर शमी आणि पायल चांगलेच चर्चेत आले. पायल याआधीही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तर तिने थेट शमीला संपूर्ण जगासमोर लग्नासाठी प्रपोज केले आहे. तिने ट्विटर हँडलवर लिहिले की, शमी, तुझे इंग्रजी सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.’ अभिनेत्रीचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर इंंटरनेटवर पायल घोष विशेष चर्चेेत आली.तिने उघडपणे शमीची दुसरी पत्नी बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान पायलच्या लग्नाच्या प्रस्तावावर शमीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. येत्या काही दिवसांत तो यावर काय बोलतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

कोण आहे पायल घोष?
पायल घोषचा जन्म १९९२ साली कोलकाता याठिकाणी झाला होता.तिने सेंट पॉल मिशन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले असून स्कॉटिश चर्च कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.तिची अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी ती कॉलेजमध्ये असताना घरातून पळून मुंबईत आली आणि तेव्हापासून तिची अभिनय कारकीर्द सुरू झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here