एस टी महामंडळ तर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमचा चालकांनीच उडवला फज्जा

0
13
एस टी महामंडळ तर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमचा चालकांनीच उडवला फज्जा-saimatlive.com

साईमत ओझर प्रतिनिधी

एकीकडे प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणत एस टी महामंडळ हात दाखवा गाडी थांबवा या पद्धतीने विविध उपक्रम राबवत असताना मात्र काही चालक त्या उपक्रमांचा फज्जा उडवताना दिसत आहे.

त्याच झालं असं शुक्रवार दि २४ मे रोजी एक महिला प्रवाशी आडगाव नाका नाशिक येथे दुगाव ता चांदवड येथे जाण्यासाठी नाशिक मनमाड बस ची वाट बघत असताना मनमाड आगाराची बस क्रं एम एच 20 बी एल 3668 ला थांबविण्यासाठी हात केला परंतु संबंधित चालकाने त्याकडे बघून ही बस न थांबावता पुढे नेली, संबंधित महिलेच्या नातेवाईकाने मोटारसायकल ने पाठलाग करून अमृतधाम जवळ बस थांबविली असता बस मध्ये फक्त थोडेच प्रवाशी असल्याचे दिसून आले, चालकाला माहिती विचारली असता उडवा उडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असताना पुढील थांब्या बुकिंग असल्याचे सांगितले.बळी मंदिर येथून ३२ प्रवाशी बस मध्ये तिकीट काढून बसले.

एकीकडे प्रवाशी एस टी महामंडळाच्या बस ने प्रवास करण्यास प्राधान्य देत असताना चालक या पद्धतीनेमहिला प्रवाशांना वागणूक देत असेल तर वरिष्ठ अधिकारी यावर काही कारवाई करतील का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here