दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, इसीसच्या सहा संशयितांना अटक

0
18

लखनौ : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध भागातून इसीसच्या सहा संशयितांना अटक केली आहे. रकीब इनाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझीम अशी या सहापैकी चौघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अलिगढ विद्यापीठाच्या स्टुडंट्‌‍स ऑफ अलिगढ युनिव्हर्सिटी (एसएएमयू) या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत.
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित आरोपी देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना आखत होते. यूपी एटीएसने सहा जणांना अटक केल्याने अलीगढ विद्यापीठात खळबळ उडाली आहे. SAMU ही ISIS मध्ये नवीन लोकांची भरती करणारी शाखा बनली आहे, असा दावाही दहशतवादविरोधी पथकाने केला. तसेच अलीगढ विद्यापीठातील इतर काही विद्यार्थीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काही दिवसांपूर्वी पुण्यातून इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) मॉड्यूल प्रकरणात रिझवान आणि शाहनवाज यांना अटक केली होती. संबंधितांची चौकशी केली असता अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील अनेक विद्यार्थी सोशल मीडियातून देशविरोधी अजेंडा राबवण्यात गुंतल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे यूपी एटीएसने आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.सर्व संशयितांची कसून चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here