Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»भडगाव»कजगावला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
    भडगाव

    कजगावला कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, कजगाव, ता. भडगाव : वार्ताहर

    येथे अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने कजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बस्थानक परिसरातील सावता माळी चौक भागातील शिवाजी नथ्थु महाजन (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. दिवसभर काबाडकष्ट करून ते पूर्णवेळ शेतकरी म्हणून काम करीत होते. मात्र, अशा कष्टाळू शेतकऱ्यांच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले आहे. दिवाळी होऊन दोन दिवस होत नाही तोच अश्‍या पद्धतीने शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याने कजगाव परीसरात शोक व्यक्त होत आहे.

    पावसाने मारलेल्या दांडीने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. शेतातील उत्पन्न ७० टक्यांपेक्षा अधिकचे घटल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेती उपयोगासाठी खर्च केलेले पैसे शेतातून निघाले नाहीत. त्यामुळे घेतलेल्या कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालल्याने समोरील संकट दिवसेंदिवस गडद होत चालले होते. येणारे उत्पन्न पाहुन शेतीवर घेतलेले अनेक प्रकारचे कर्ज फेडण्याची कुठलीही शक्यता समोर दिसत नव्हती. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे जीवन संपवून घेतले. गावातील एक तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत शेतकऱ्यावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon : लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात जमा होणार

    March 25, 2026

    MSRTC BUS : महाराष्ट्रातील सर्व सरकारी एसटी बस इलेक्ट्रिक होणार; ‘लालपरी’चा नवा काळ

    March 17, 2026

    Pachora-Bhadgaon : पाचोरा-भडगाव तालुक्यात २५ कोटींच्या रस्ते व पुलांच्या कामांना मंजुरी

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.