मधुकर साखर कारखाना त्वरित सुरू करा

0
19

साईमत फैजपूर प्रतिनिधी

मधुकर सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुमारे पाच वर्षापासून बंद आहे. नंतर ही कारखान्याची यंत्रे काही कारणास्तव कायम स्वरूपाची बंद झालीत. परिणामी कारखान्यात कामकरणारे कर्मचारी देशोधडीला लागले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मुला – मुलींचे शिक्षण, कार्य ठप्प होण्याची मार्गावर आलीत. कोरोना सारख्या जगभर आलेल्या संकटामुळे आर्थिक चलनवलन बंद झाल्याने कर्मचाऱ्यांजवळील जमापुंजी संपुष्टात आली आहे. त्यासाठी कामावर जाण्याचे निवेदन मधुकर साखर कारखाना राष्ट्रीय कामगार युनियनचे सेक्रेटरी सुनील कोलते यांच्याकडे पटावरील कामगारांनी दिले आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये जिल्हा सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होईल, या आशेने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी कामगार, कारखान्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मधुकर सहकारी साखर कारखाना विकत घेणाऱ्या कंपनीने जुन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून कामकाज युद्ध पातळीवर सुरू केले. कामगारांनी कारखाना विकत घेतलेल्या कंपनीला कुठल्याही कामगार युनियन मध्ये सहभागी होणार नाही, असे लिहून दिले होते. परंतु डिसेंबर २०२२ मध्ये कामगारांची मागील थकीत येणी वसुलीसाठी इच्छा नसतानाही युनियनला पाठिंबा द्यावा लागला. कामगारांच्या मुलाबाळांची शिक्षण, लग्नकार्य, यामुळे मागील घेणे मिळण्यासाठी अपरिहार्यता म्हणून युनियनला पाठिंबा देणे भाग पडले. यामुळे कामगारांची सुरू झालेली रोजी रोटी मात्र बंद झाली. उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न कामगारांसमोर निर्माण झाला आहे. थकित रकमा कामगारांना मिळाव्यात परंतु, कामगारांना कामावर जाणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी कामावर जाण्याचे निवेदन मधुकर साखर कारखाना राष्ट्रीय कामगार युनियनचे सेक्रेटरी सुनील कोलते यांच्याकडे पटावरील कामगारांनी दिले आहे.

कारखान्याची चाके सुरळीत सुरू ठेवून कारखान्याकडे कामगार व सेवानिवृत्त कामगारांची सेजवानी माताकी माणून नामोचील रक्कम लढा सुरू ठेवावा असे कर्मचाऱ्यांत ठरले. लढ्यात कारखाना कामगार व्यतिरिक्त कोणत्याही घटकाचे हस्तक्षेप कर्मचाऱ्यांना मान्य नाही असेही निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. मागील वर्षी कामावर आलेले कर्मचारी गेल्या सात महिन्यांपासून काम व पगाराशिवाय आहोत. हा कारखाना आज रोजी इंडिया बायो ऍग्रो कंपनीने घेतलेला आहे. जे कर्मचारी कामावर घेतलेले आहे ते अधिक नवीन घेतलेले कर्मचारी सर्व मिळून कारखाना पूर्ववत सुरू करण्यास कटिबद्ध आहेत. कारखाना सुरू करून पुन्हा कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे अशी कामगारांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here