Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»उमरखेडमध्ये अज्ञात तरुणांनी एसटी बस जाळली
    राज्य

    उमरखेडमध्ये अज्ञात तरुणांनी एसटी बस जाळली

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यवतमाळ : वृत्तसंस्था

    राज्यात मराठा आंदोलन पेटले असताना मराठाबहुल उमरखेड तालुक्यात अज्ञात तरुणांनी राज्य परिवहन विभागाची बस पेट्रोल ओतून जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील गोजेगाव नजीकच्या पैनगंगा पुलावर घडली. बसमधील ७३ प्रवासी सुखरूप आहे.
    नांदेड आगाराची नांदेड-नागपूर बस रात्री ११ वाजता पैनगंगा पुलाजवळ पोहोचताच मागाहून आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने ही बस थांबवली. त्याच्यामागून परत पाच ते सहा लोक आले. त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर या अज्ञात लोकांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली.
    या घटनेत बसचे (क्र. एमएच २०- जीसी ३१८९) ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. बस जाळणारे कोण होते, त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध उमरखेड पोलीस घेत आहेत.
    या बसवर चालक बी.डी. नाईकवाडे तर वाहक एस.एन. वाघमारे हे होते.घटनास्थळी यवतमाळ आणि नांदेड एसटी विभाग नियंत्रकांसह पोलिसांनी भेट दिली. याप्रकरणी अद्याप कोणत्याही आरोपीची ओळख पटली नाही. हा प्रकार मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने घडला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत
    आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Pakistan Threat Attack Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची धमकी : “भारताने हल्ला केला, तर आम्ही थेट कोलकात्यावर हल्ला करू!”

    April 5, 2026

    Accident : बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    March 31, 2026

    मध्यपूर्वेतील संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेला इशारा; IMF कडून महागाई वाढीचा अंदाज

    March 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.