पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांचे शिवसेना उबाठाने केले श्राद्ध…!

0
55

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार,️ पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी:

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जळगाव ग्रामीण मतदारसंघात रस्त्याचे श्राद्ध घालून आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. चार महिन्यांपूर्वी तयार झालेला भोकर ते पळसोद, जामोद, आमोदा बु., गाढोदा रस्ता हा कात टाकायला लागला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जळगाव ग्रामीणचे शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांना समस्या सांगितल्यावर त्यावर रस्त्याची लांबी ११.९३ किलोमीटर आहे. त्याचा एकूण खर्च ८१८.३२ लाख रुपये इतका आहे. हा रस्ता भोकर-पळसोद-जामोद-आमोदा बु.-गाढोदा असा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार केला आहे. या रस्त्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झालेला आहे, असा संशय आम्हाला आहे. म्हणून रस्त्याची चौकशी करून कार्यकारी अभियंता प्रधान मंत्री ग्रामसडक योजना तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच पालकमंत्री यांनी जबाबदारी स्वीकारावी व तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी जळगाव ग्रामीणचे शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी केली आहे. त्यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलनात यांचा होता सहभाग

हे आंदोलन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनात भगवान धनगर, भरत पाटील, प्रभाकर कोळी, एकनाथ सैंदाणे, समाधान पाटील, योगराज पाटील, हेमंत पाटील, मच्छीन्द्र पाटील, बाबुराव पाटील, डॉ.ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, शिरीष पाटील, विकास पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, मुकेश बारेला, प्रवीण पाटील, हिरालाल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here