साईमत प्रतिनिधी
नाताळ सुट्टीपासून ते सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या कालावधीत, श्री साईबाबांच्या समाधीवर देश-विदेशातील सुमारे ८ लाख साईभक्तांनी दर्शन घेतले, आणि संस्थानाला २३ कोटी २९ लाख २३ हजार रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. ही माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
श्री. गाडीलकर यांनी सांगितले की, देणगीचे माध्यम खालीलप्रमाणे होते:
-
दानपेटी: ६ कोटी २ लाख ६१ हजार रुपये
-
देणगी काउंटर: ३ कोटी २२ लाख ४३ हजार रुपये
-
सशुल्क पास (जनसंपर्क कार्यालय): २ कोटी ४२ लाख ६० हजार रुपये
-
डेबिट, क्रेडिट, ऑनलाईन, चेक/डीडी व मनीऑर्डर: १० कोटी १८ लाख ८६ हजार रुपये
-
विदेशी चलन (२६ देश): १६ लाख ८३ हजार रुपये
याबरोबरच, सोने २९३.९१० ग्रॅम (३६ लाख ३८ हजार ६१० रुपये) आणि चांदी ५ किलो ९८३ ग्रॅम (९ लाख ४९ हजार ७४१ रुपये) देणगी स्वरुपात प्राप्त झाली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ६५५ ग्रॅम वजनाचे सुवर्ण-हिरेजड मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे ८० लाख रुपये आहे. या मुकुटात सुमारे ५८५ ग्रॅम शुद्ध सोने आणि १५३ कॅरेटचे मौल्यवान हिरे आहेत.
या काळात श्री साईप्रसादालयात ६ लाखाहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला, तर सुमारे १ लाख ९ हजार साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला. शिवाय ७,६७,४४४ लाडू प्रसाद पाकीटांची विक्री झाली, ज्यातून २ कोटी ३० लाख २३ हजार रुपये प्राप्त झाले. तसेच ५,७६,४०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकीटाचा लाभ घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी सांगितले की, या देणग्या आणि दानांचा उपयोग श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय, श्री साईनाथ रुग्णालय, श्री साईप्रसादालय मोफत भोजन, शैक्षणिक संस्था, बाह्यरुग्णांना आर्थिक मदत, साईभक्तांच्या सुविधा आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी केला जात आहे.
या नऊ दिवसांच्या अल्प कालावधीत प्राप्त झालेली देणगी ही संस्थेच्या सेवाकार्यात नवा विक्रम असून, साईभक्तांच्या श्रद्धा आणि समाजसेवेतील त्यांचा सहभाग याचे प्रतिक ठरते.
