प.वि.पाटील विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांना प्रतिसाद

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, जळगाव येथे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे तसेच उपक्रमांचे आयोजन केले होते. त्यात पालकांसाठी अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी अथर्वशीर्ष पठण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एका मिनिटात मनोरंजनात्मक स्पर्धा तसेच काही क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले होते. विद्यार्थ्यांसाठी गणपती बाप्पांचा मुखवटा तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांची स्पर्धा घेण्यात आली.

सर्व स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनासाठी करण्यात आले. यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव, उपशिक्षिका कल्पना तायडे, स्वाती पाटील, कायनात सय्यद, गायत्री पवार, कल्पना पाटील, मंगल गोठवाल आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here