साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यात भाजप सरकार विरोधात काँग्रेसतर्फे जनसंवाद यात्रा काढण्यात येऊन जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशात नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. अच्छे दिनाची सर्वसामान्य जनतेला भुरळ मोदी सरकारने घालुन जनतेचा विश्वासघात केला. काँग्रेस जनसंवाद यात्रा ग्रामीण भागात दोन दिवस फिरली. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात गावातील सभेत नागरिकांचे मन परिवर्तन होण्याकरिता काँग्रेस पदाधिकारी सभा घेत आहे. सर्व स्तरातून प्रत्येक गावातील लोक मोदी सरकार विरोधात आपल्या मनातील रोष, महागाईबद्दल मुद्दे सभेत मांडत आहेत. जनसंवाद पदयात्राची सुरुवात तालुक्यातील पातोंडा येथून आ.कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बंटी पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्ह्याभरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सावखेडा गावात पहिल्या दिवशी मंदिरात सभा घेण्यात आली. सभेस शेकडो नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत धुडकू पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी मनोगत व्यक्त केले. निंब गावात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शाखेचे फलक अनावरण जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यात्रेत यांचा होता सहभाग
जनसंवाद यात्रेत जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, सचिव ज्ञानेश्वर कोळी, प्रदेश उपाध्यक्ष बंटी भैया, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, स्वयंरोजगार सभेचे जिल्हाध्यक्ष देविदास ठाकरे, रावेरचे धनंजय चौधरी, भडगावचे युवा अध्यक्ष आशुतोष पवार, एन. एस.व्ही.आय जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, अमळनेर शहराध्यक्ष नयना पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी .डी पाटील, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष के.डी. पाटील, तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, शहराध्यक्ष मनोज पाटील, धुळे मार्केट कमिटीचे सदस्य योगेश पाटील, संदीप घोरपडे, जयवंत आबा, भागवत गुरुजी, रोहिदास पाटील मुडी, श्रीराम आप्पा, डॉ.अनिल शिंदे, बी.के.बापू, श्याम बापू, धनगर आण्णा, मयूर पाटील, महेश पाटील, तुषार संदानशिव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिभाऊ, मार्केट कमिटीचे संचालक सुरेश पाटील, आयोजक सुनील पाटील, पातोंडा सहभागी झाले होते. तसेच तालुक्यातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.