साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात यंदा पावसाअभावी परिसरातील खरीप आणि रब्बीची नापेर स्थिती झाली आहे. त्यामुळे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अशातच परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पाटाला ३ पाणीसह पहिले पाणी नोव्हेंबर महिन्यात सोडण्यात यावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांसह शिवसेना उबाठाचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्री.सूर्यवंशी, पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधिकारी विजय जाधव यांना मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी देण्यात आलेे.
परिसरात कापूस, ज्वारी, मका लागवडीसाठी साधारण २० ते २२ हजार खर्च झालेला आहे. त्यामुळे अखेरीस पाऊस झाला तरच शेतकऱ्यांच्या हातात काही मिळेल अन्यथा झालेला खर्च, कष्ट वाया जाणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. परिसरातील प्रत्येक गावातून पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शासनाने त्वरित पिण्याच्या पाण्याची सोय तसेच जनावरांची छावणी करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. धरणगाव तालुक्यातील जिरायती पट्ट्यात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळ जाणवत आहे. जनावरांना चाराटंचाई असून येत्या नोव्हेंबरमध्ये पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे. अशा विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावर त्वरित तोडगा न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देतेवेळी जळगाव-लोकसभा शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नगराध्यक्ष निलेश चौधरी, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सोनवणे, जिल्हा उपसंघटक राजेंद्र ठाकरे, उप तालुकाप्रमुख नंदू पाटील, शेतकरी तालुकाप्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी, मा. नगरसेवक जितेंद्र धनगर, मा.नगरसेवक किरण भाऊसाहेब, मा.नगरसेवक उमेश महाजन, उप तालुका संघटक लीलाधर पाटील, फिरोज अब्बामिया पटेल, छोटू चौधरी, गोपाल चौधरी, बाळू महाजन, रणजीत शिकरवार, सचिन चव्हाण, संतोष सोनवणे, संजय धामोळे, रमेश पारधी, ज्ञानेश्वर महाजन, संतोष महाजन, राहुल चव्हाण, किरण अग्निहोत्री, नरेंद्र शिरसाट, किशोर महाजन, सुदर्शन भागवत, साळवे येथील संजय नारखेडे, पिंपरी येथील योगराज धनगर, रमेश पांडे, पिंटू महाजन, अमोल चौधरी, गजानन महाजन, गोपाल पाटील यांच्यासह शिवसेना उबाठा, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.