Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रायसोनी पब्लिक स्कूलला ‘इन्वेस्टेचर सेरेमनी’ चे आयोजन
    जळगाव

    रायसोनी पब्लिक स्कूलला ‘इन्वेस्टेचर सेरेमनी’ चे आयोजन

    SaimatBy SaimatSeptember 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत : जळगाव : प्रतिनिधी

    सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे “इन्वेस्टेचर सेरेमनी” हा शालेय स्तरावरील समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी दशेतच आगामी नेतृत्व, ठराविक भूमिका व जबाबदाऱ्या सोपवून नेतृत्व गुणांच्या विकासासाठी प्रत्यक्ष अध्ययनाचा विद्यार्थ्यांना अनुभव देण्यासाठी इन्वेस्टीचर सेरीमनी नितांत गरजेची असते. शालेय जीवनात मिळालेल्या या संस्कारांमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रबलता येते व आगामी जीवनात संघ व्यवस्थापन कौशल्य व स्वयंशिस्त यांसारख्या जबाबदाऱ्या ते सक्षमपणे पार पाडू शकतील या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मिलिंद थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा व्यासपीठावर उपस्थित होते.

    यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध पदांचा कार्यभार सोपवत त्यांना बॅचेस व शाश रिबीन प्रधान करण्यात आले.
    प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे मिलिंद थोरात यांनी स्वतः बद्दलचे शालेय अनुभव विद्यार्थ्यांना सांगत आपल्या जीवनातील वेळेचे व त्याच बरोबर खेळाचे महत्व देखील सांगितले. यावेळी त्यांनी प्रस्तुत कार्यक्रमाच्या व्यवस्थितरित्या केलेले आयोजन, विद्यार्थ्यांची शिस्त या सर्वांची प्रशंसा करत विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    यावेळी रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींना त्यांच्या पदाची जबाबदारी देत सर्वाना विधीच्या माध्यमातून शपथ दिली. तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या कि, “ए विजन बियोंड” हे जी. एच. रायसोनी ग्रुपचे ब्रीदवाक्य असून त्याला वास्तवात रुपांतर करणारा हा एक विशेष सोहळा आहे.
    या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व तालबद्ध रीतीने संचलन करून उपस्थित मान्यवरांना सलामी दिली. या नयनरम्य संचलनाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकून सर्व विद्यार्थी कौतुकास पात्र ठरले. तसेच शालेय शिक्षणाबरोबरच, व्यक्तिमत्व विकास, विविध अॅक्टीव्हीटीलाही महत्त्वपूर्ण स्थान देणारी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक गुणवत्तेस सतत प्रेरणा व चालना देणाऱ्या सी.बी.एस.ई.बोर्डच्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे या उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

    जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथील इन्वेस्टेचर सेरेमनीत हेड बॉय सिद्धांत काबरा तर हेड गर्ल म्हणून टिया देसाई यांची निवड करण्यात आली तसेच ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू, पर्पल या चार हाउसेस मधील प्रीफेक्ट म्हणून ग्यान झवर, रोनक दहाड, पार्थ नारखेडे, नामी रांका, हार्दिक मनोचा, तस्नीम बदामी, देवेंद्र वर्मा, रितिक मराठे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यानंतर कोडींग क्लब – वेदांत जंगले, लेट्स टॉक क्लब – पार्व जैन, स्पोर्ट्स क्लब – श्लोक महाजन, कल्चरल क्लब – कनक सोनवणे, डिसिप्लिन कमिटी – राधिका सोनी या पदांवर विविध वर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ तलाठी कार्यालयाचे ४२,५६० रुपयांचे वीज बिल थकीत

    March 14, 2026

    Jalgaon:एमआयडीसीत थकबाकीदारांविरुद्ध जोरदार कारवाई, दोन कंपन्यांना तातडीने सील

    March 14, 2026

    Jalgaon:जळगाव पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये पोलीस ठाण्यात हाणामारी

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.