पाउस लांबला, नंदुरबार वगळता खानदेशातील गावांचा पाणीप्रश्न गंभीर, प्रकल्पांच्या पातळीत घट

0
5
पाउस लांबला, नंदुरबार वगळता खानदेशातील गावांचा पाणीप्रश्न गंभीर, प्रकल्पांच्या पातळीत घट-saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी

यावर्षी तापमानाचा पारा ४८°© वरून ३५°© च्या जवळपास आलेला आहे. मान्सून यावर्षी रुसल्या प्रमाणे जूनअखेर केवळ जेमतेम चारच दिवस बरसला असून जेमतेम २१ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे खान्देशात नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्प वगळता जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांची पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे. नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, अर्जूनसागर, हरणबारी, नागासाक्या, माणिकपंुज आिद प्रकल्पांमधून गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक होते. त्या गिरणा प्रकल्पात आजमितीस केवळ २१.७४ टक्के साठा आहे.
जळगाव जिल्हयात ९६ मध्यम, लघू, मोठया प्रकल्पांत सरासरी ३०.४५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.नाशिक जिल्ह्याीतल चणकापूर, अर्जूनसागर(पुनद)सह अन्य प्रकल्पांतून गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक होते. या गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा आणि भडगाव तालुक्यासह ग्रामीण भागांचा पाणीप्रश्न काहीसा गंभीर होत आहे.

गिरणा प्रकल्पातून अजून एक आवर्तन शिल्लक जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा ढगाळ वातावरण असल्याने ३७ अंशा दरम्यान आहे. सकाळच्या उन्हाचे चटके बसत नसले तरी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून गिरणा प्रकल्पांसह हतनूर, वाघूर आिद मध्यम लघू प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यांचा पाणीपुरवठा अवलंबुन असलेल्या गिरणा प्रकल्पात गत सप्ताहात २६ टक्के पाणीसाठा होता. तो आज केवळ २१.७३ टक्के इतका राहीला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ३३.४७ टक्के पाणीसाठा होता. ५२३.५५ दलघमी पाणीसाठा क्षमता असलेल्या या प्रकल्पात केवळ ११४.३६ दलघमी पाणीसाठा असल्याने तोही आता झपाट्याने खालावत आहे. गिरणा प्रकल्पातून अजून पाण्याचे एक आवर्तन द्यावे लागणार आहे.
जळगाव शहराला चिंता नाही जिल्ह्यातील हतनूर आणि वाघूर या दोन मोठ्या प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असून तापी नदीवरील हतनूर प्रकल्पात ३८.८२ तर जळगाव शहराला पाणी पुरवणाऱ्या वाघूर मध्ये ५८.०७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची सध्यातरी चिंता नाही.

पाचोरा भडगाव शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा
गिरणा प्रकल्पावर चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. चाळीसगाव शहरासाठी प्रकल्पावरून जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा होत असल्याने तेथे पाणीटंचाई नाही. परंतु नदीकालव्याव्दारे पाचोरा भडगाव साठी पाणी सोडण्यात येत असून मे महिन्यांनंतर आवर्तन दिलेले नाही. त्यामुळे पाचोरा आणि भडगाव या दोन्ही शहरांमध्ये आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा असल्याने पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

खानदेशातील प्रकल्पस्थिती
नाशिक… चणकापूर २७.७४, अर्जूनसागर (पुनद) ३३.९८, हरणबारी ३५.३७, केळझर ३२.५५, नागासाक्या आणि माण्िाकपुंज शून्य टक्के असून सरासरी २०.५० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी १३.२७ टक्के साठा होता.
जळगाव…. हतनूर ३८.६२, िगरणा २१.७४, वाघूर ५८.०७, अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, तांेडापूर आिण गुळ सरासरी ५० टक्के, बहुळा १६.३६, अंजनी ९.१४, हिवरा ४.४६, मन्याड ६.५६ तर अग्नावती, भोकरबारी आिण बोरी शून्य टक्के असा सरासरी ३०.४५ टक्के जलसाठा आहे.गतवषी या प्रकल्पांमध्ये ३२.४४ टक्के साठा होता.
धुळे….सुलवाडे ४६.७४, सारंगखेडा बॅरेज २७.४९, पांझरा २७.२०, मालनगाव १८.१८, जामखेडी २४.८८, बुराई १२.५३, करवंद १४.५७, अनेर २४.५४, सोनवद, कनोली आिण अमरावती शून्य टक्के असा सरासरी २१.३५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.गतवषी या प्रकल्पात २२.१२ टक्के जलसाठा होता.
नंदुरबार….प्रकाशा बॅरेज ७०, रंगावली २२.२७, शिवण ४१.५० आणि दरा ८५.९५ असा सरासरी ५३.१२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवषी ४३.२० टक्के होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here