
मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मोमिनाबाद जि.प.म.उ.प्रा.शाळा येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज ह्यांच्या जीवनावर आधारित विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत शाळेतील १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ‘शाहू महाराज-एक आठवण’ आणि ‘शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य’ ह्या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेतील विजेत्यांना शाळेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ६ वी, ७ वीच्या गटातून सुरेखा वाघोदे तर ३ री, ५ वीच्या गटातून आरुषी वानखडे ह्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक पुरुषोत्तम राणे, रामेश्वर तायडे, सुधीर भंगाळे, सुरेश तायडे, सदाशिव पवार यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.


